शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

आता गटबाजी सोडा आणि जरा शहराकडे बघा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:20 IST

महापालिकेत सत्तांतर होऊन आता चार महिन्यांचा काळ झाला आहे. मात्र, जळगावकरांना मनपात भाजपची सत्ता असो वा शिवसेनेची, समस्या मात्र ...

महापालिकेत सत्तांतर होऊन आता चार महिन्यांचा काळ झाला आहे. मात्र, जळगावकरांना मनपात भाजपची सत्ता असो वा शिवसेनेची, समस्या मात्र कायम असतातच असे म्हणावे लागत आहे. कारण भ्रमनिराश करण्यात हे दोन्हीही सारखेच असल्याचा प्रत्यय आता जळगावकरांना येऊ लागला आहे. जळगावकरांनी स्पष्ट बहुमत देत मनपात भाजपला सत्ता दिली. मात्र, अंतर्गत गटबाजीने पोखरल्या गेलेल्या भाजपला लक्षवेधी कामे करता आली नाही. निधी आला तो खर्च करता आला नाही. त्यामुळे अडीच वर्षांत नागरिक भाजपला कंटाळून गेले होते. त्यात २७ नगरसेवकांनी भाजपविरोधात बंड पुकारून शिवसेनेची सत्ता महापालिकेत आणली. राज्यात व मनपातही सेनेची सत्ता आल्याने जळगावकरांना या बदलाकडून अपेक्षा होत्या. मात्र, गटबाजीचे ग्रहण भाजपप्रमाणे शिवसेनेतही वाढत आहे. बंडखोर नगरसेवक भाजपमध्ये होते आता शिवसेनेत गेले आहेत. मात्र, गटबाजीचे ग्रहण आता सेनेतही सुरू झाले आहे. त्याचा फटका जळगावकरांना बसत आहे. केवळ स्वत:च्या स्वार्थाकडे लक्ष देण्यात गुंग असलेल्या या नगरसेवकांना जळगावकरांचा पूर्णपणे विसर पडलेला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे महापालिकेत येणार असल्याचे माहीत पडताच जळगावकरांच्या थांबलेल्या विकासाला गती देण्यासाठी भरघोस निधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. कारण, मनपातील नगरसेवकांना शहराचा विकासापेक्षा इतरांच्या तक्रारी शिंदेकडे सांगण्यात जास्त रस होता. शहरातील रस्त्यांची समस्या बिकट झाली असताना त्याच्या तक्रारी या नगरसेवकांकडून नगरविकासमंत्र्यांकडे करण्यात आल्या नाहीत. तर शिंदे मनपात येतील आणि संपर्कप्रमुख, पालकमंत्री यांच्या तक्रारी त्यांच्याकडे करण्यावर नगरसेवकांचा भर होता. त्यामुळे गटबाजी वाढलेल्या या महापालिकेत आज जरी सेनेची सत्ता असली तरी स्वार्थापोटी जनतेला विसरणारे हे नगरसेवक उद्या शिवसेनेत राहतील की नाही ? अशी शंकाच शिंदेच्या मनात आली असेल, म्हणून शहराच्या समस्या आणि मनपाचे प्रश्न ऐकून शिंदे यांनी मुंबईत येण्याचा सूचना नगरसेवकांना केल्या आहेत. शहरातील समस्या वाढत आहेत. रस्ते, वाहतूककोंडी, धुळ, चिखल, पार्किंग, अतिक्रमण, तुंबलेल्या गटारी, घाणीचे साम्राज्य अशा समस्यांकडे आता नवग्रह मंडळातील नगरसेवक असो वा कट्टर शिवसैनिक नगरसेवक, आता जळगावकरांच्या समस्यांचे ग्रहण सोडवा, अन्यथा जळगावकर कोणताही पक्ष असो त्याला कायमचे ग्रहण लावतील.