जळगाव शहरात चोरट्यांनी लांबविले नवरदेव, नवरीचे दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:35 PM2018-04-07T12:35:20+5:302018-04-07T12:35:20+5:30

लग्नाच्या एक दिवस आधी चोरट्यांनी नवरदेव,नवरीचे दागिने, कपडे व एक लाखाची रोकड लांबविल्याची घटना शनिवारी पहाटे पाच वाजता सुप्रीम कॉलनीत उघडकीस आली. याशिवाय परिसरातील दोन घरातही मोबाईल, किरकोळ रक्कम व कागदपत्रांची बॅग चोरट्यांनी लांबविली आहे.

Navarwi jewelery has been extended by the thieves in Jalgaon city | जळगाव शहरात चोरट्यांनी लांबविले नवरदेव, नवरीचे दागिने

जळगाव शहरात चोरट्यांनी लांबविले नवरदेव, नवरीचे दागिने

Next
ठळक मुद्दे सुप्रीम कॉलनीत तीन ठिकाणी चो-या  रोख रक्कम व कपड्यांसह अडीच लाखाचा ऐवज लांबविला चोरट्यांचा धुमाकूळ

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,७ : लग्नाच्या एक दिवस आधी चोरट्यांनी नवरदेव,नवरीचे दागिने, कपडे व एक लाखाची रोकड लांबविल्याची घटना शनिवारी पहाटे पाच वाजता सुप्रीम कॉलनीत उघडकीस आली. याशिवाय परिसरातील दोन घरातही मोबाईल, किरकोळ रक्कम व कागदपत्रांची बॅग चोरट्यांनी लांबविली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सुप्रीम कॉलनीत इदगाहच्या पाठीमागे वास्तव्याला असलेले शेख रज्जाक शेख गनी (वय ५०) यांचा मुलगा शेख सलीम शेख रज्जाक याचे रविवारी लग्न आहे. शनिवारी दुपारी हळदीचा कार्यक्रम होता. घराला रंगकाम सुरु असल्याने शेख यांनी शेजारीच्या पार्टीशनच्या रिकाम्या घराता सामान, नवरदेव, नवरीचे दागिने, त्यांचे नवीन कपडे तसेच एक लाख रुपये रोख असे साहित्य एका पेटीत ठेवले होते.
चोरट्यांनी पेटीच पळविली
उन्हाळा असल्याने घरातील शेख रज्जाक शेख गनी, त्यांचे मुले सलीम, नुरा, रहिम, कलीम, आदील व शादल असे सर्वच महिला, पुरुष गच्चीवर झोपले होते. सकाळी साडे पाच वाजता पाऊस सुरु झाल्याने सर्व जण उठून खाली आले असता घरापासून काही अंतरावर दागिने व रोकड ठेवलेली पेटी उघड्या अवस्थेत आढळून आली. पार्टीशनच्या घराचे कुलुप तुटलेले होते. शेख रज्जाक यांनी पाहणी केली असता घरातील सर्व मौल्यवान वस्तू चोरट्यांनी लांबविल्याचे उघड झाले. त्यात दोन मंगळसूत्र, कानातील रिंगा, पैंजन, मुलीची पोत गायब होत्या.

Web Title: Navarwi jewelery has been extended by the thieves in Jalgaon city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.