शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

नाना दाढीने १२.१0 वाजता नेली १२ नंबरची सायकल

By admin | Updated: December 4, 2014 15:02 IST

शिव कॉलनी भागातील विनायक सोनवणे खून प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी.अग्रवाल यांच्या न्यायालयात नम्रता सायकल मार्टचे मालक प्रकाश धनगर हे साक्षी दरम्यान गोंधळले.

जळगाव : शिव कॉलनी भागातील विनायक सोनवणे खून प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी.अग्रवाल यांच्या न्यायालयात नम्रता सायकल मार्टचे मालक प्रकाश धनगर हे साक्षी दरम्यान गोंधळले. त्यांना समजावण्याचा प्रयत्न करणार्‍या सरकार पक्षाला न्यायालयाने फटकारले. आरोपी नाना दाढी याने घटनेच्या दिवशी १२.१0 वाजता १२ नंबरची सायकल नेल्याची साक्ष धनगर यांनी दिली.
विनायक सोनवणे खून प्रकरणात नम्रता सायकल मार्टचे मालक प्रकाश धनगर व पंच महेंद्र सोनवणे यांची सरकारी वकील गोपाळ जळमकर यांनी साक्ष घेतली. धनगर यांनी आपल्या साक्षी दरम्यान घटनेच्या दिवशी नाना दाढी याने नम्रता सायकल मार्टवरून दुपारी १२.१0 वाजेच्या सुमारास १२ नंबरची सायकल नेली होती. त्यानंतर दुसर्‍या दिवशी आपल्या दुकानावर पोलीस आले. त्यांनी पोलीस निरीक्षक वाय.डी.पाटील यांनी पोलीस स्टेशनला बोलविल्याचे सांगितले. पाटील यांनी १२ नंबरची सायकल कुणी नेली होती याबाबत विचारणा केली. त्यावेळी आपण रजिस्टरमधील नोंद पाहून नाना दाढी याने ती सायकल नेल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी रजिस्टर जप्त केले. 
नाना दाढी याला ओळखतो का? अशी विचारणा केल्यानंतर धनगर यांनी होकार दिला. काही वर्षांपूर्वी नाना याची नवीन बसस्थानकाजवळ पानटपरी होती. मात्र घटनेपूर्वी त्याने सायकल भाड्याने नेली नसल्याचे त्याने सांगितले. यावेळी त्याने सायकल ओळखली. 
त्यानंतर या प्रकरणातील दुसरे पंच साक्षीदार महेंद्र सोनवणे यांची साक्ष झाली. त्यांनी आपल्यासमोर पोलिसांनी नम्रता सायकल मार्टमधील रजिस्टर जप्त केल्याचे सांगितले. यावेळी बचाव पक्षातर्फे त्यांची उलटतपासणी घेण्यात आली. या प्रकरणात आता गुरुवारी कामकाज होणार आहे.
-----------------
आरोपीतर्फे अँड.अ.वा.अत्रे यांनी धनगर यांची उलटतपासणी घेतली. नाना हा भजे गल्लीत येत नव्हता हे बचाव पक्षाचे म्हणणे नाकारले. यावेळी पोलिसांनी जप्त केलेल्या रजिस्टरमध्ये भाड्याच्या रकमेचा कॉलम सांगत असताना धनगर गोंधळले. त्यावेळी सरकार पक्षाने धनगर यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्याला बचाव पक्षाने आक्षेप घेतला. न्यायालयाने 'तुम्ही साक्षीदारांना मदत करीत आहात' अशी सूचना करीत सरकार पक्षाला फटकारले.