मोटारसायकल, रिक्षा जुने धुळ्यात जाळली

By Admin | Updated: January 12, 2015 13:33 IST2015-01-12T13:28:11+5:302015-01-12T13:33:41+5:30

जुने धुळ्यात मोटारसायकल व रिक्षा जाळल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. दोन्ही वाहने समाजकंटकांनी जाळल्याचा संशय आहे. घटनेत ५0 ते ६0 हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

Motorcycles and rickshaws were burnt in old Dhule | मोटारसायकल, रिक्षा जुने धुळ्यात जाळली

मोटारसायकल, रिक्षा जुने धुळ्यात जाळली

धुळे : जुने धुळ्यात मोटारसायकल व रिक्षा जाळल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. दोन्ही वाहने समाजकंटकांनी जाळल्याचा संशय आहे. घटनेत ५0 ते ६0 हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 
कुंभार खुंट परिसरातील आकाश यशंवत माळी व प्रवीण मधुकर जगदाळे यांनी शनिवारी रात्री मोटारसायकल व रिक्षा घराजवळ लावली. मात्र पहाटे ही वाहने जळाल्याचे दिसले. रिक्षाचा पुढील भाग जळाला आहे. याप्रकरणी माथेफिरू समाजकंटकांचा शोध घेण्याची मागणी संबंधित वाहनधारकांनी केली आहे. जगदाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथमदश्री आझादनगर पोलिसात अग्निउपद्रव दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Motorcycles and rickshaws were burnt in old Dhule