शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

केवळ सिगारेटमुळे सापडला मोबाईल चोरटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 10:11 PM

जळगाव : पोलिसांनी ठरवलं तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही...कधी पोलिसांचे लक अन् गुन्हेगाराचे बॅडलक हे देखील कारणीभूत असते. तांत्रिक ...

जळगाव : पोलिसांनी ठरवलं तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही...कधी पोलिसांचे लक अन् गुन्हेगाराचे बॅडलक हे देखील कारणीभूत असते. तांत्रिक पुरावे घटनास्थळावरील काही पुरावे गुन्हे उघडकीस आले आहेत. खबऱ्या ही संकल्पना लोप पावत असताना.. आता सिगारेट व खबºया यांच्यामुळे रिक्षातून प्राध्यापकाचा मोबाईल लांबविणारा चोरटा पोलिसांच्या हाती लागला आहे.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रा.विजय एल. माहेश्वरी २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी बºहाणपूर येथून जळगाव स्थानकावर उतरले. गुजराल पेट्रोल पंपाच्या पाठीमागे ते वास्तव्याला असल्याने शिवाजीनगरच्या दिशेने रिक्षा थांब्यावर गेले. तेथून एका रिक्षातून ते घरी गेले. यादरम्यान रिक्षा चालकाने सिगारेट ओढली व एका ठिकाणाहून शेंगदाणे घेतले. पुढे काही अंतरावर मागे बसलेले दोघे प्रवाशी उतरले. पुढचा रिक्षा चालकाचा मित्र मागे प्रा. माहेश्वरी यांच्याजवळ बसला. गुजराल पेट्रोल पंपाजवळ उतरल्यावर माहेश्वर यांना मोबाईल गायब झाल्याचे लक्षात आले.चोरी गेलेला मोबाईलबाबत प्रा. माहेश्वरी यांनी विद्यापीठातील कायदा अधिकारी प्रा. एस. आर. भादलीकर व संगणक प्रशास्त्र विभागाचे प्रा. राम भावसार यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांची भेट घेऊन माहिती दिली. रोहोम यांनी विजय पाटील, नरेंद्र वारुळे, दिनेश बडगुजर व चंद्रकांत पाटील यांना याबाबत सूचना केल्या. यात प्रा. माहेश्वरी यांनी चालकाला सिगारेट व्यसन असल्याचे सांगितले. त्यामुळे दिनेश बडगुजर यांनी गुजराल पेट्रोल पंपाजवळील खबºयाचा वापर करुन सिगारेटचे व्यसन असलेल्या रिक्षा चालकाची माहिती काढली असता एकजण निष्पन्न झाला. त्यानंतर प्रा. माहेश्वरी यांना लपून खात्री करायला सांगितली. तो निष्पन्न झाल्यावर त्याचवेळी प्रा.माहेश्वरी यांच्या मुलीने त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला असता एकदा रिंग वाजली नंतर फोन बंद झाला. त्यामुळे यंत्रणेने तांत्रिक आधार घेऊन मोबाईल असलेली व्यक्ती कुठे आहे याचा शोध घेतला असता रिक्षाचालक व त्याचा मित्र असे दोघं निष्पन्न झाले. पोलीसी खाक्याचा दम भरताच त्यांनी मोबाईल काढून दिला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव