बोदवडला मध्यरात्रीचा थरार; गायी चोरणाऱ्या टोळीशी झटापट, दोन तरुण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 11:18 IST2021-09-10T11:17:47+5:302021-09-10T11:18:02+5:30
तीन वाहनांसह आरोपी फरार झाले आहेत.

बोदवडला मध्यरात्रीचा थरार; गायी चोरणाऱ्या टोळीशी झटापट, दोन तरुण जखमी
बोदवड जि.जळगाव : गायी चोरणाऱ्या टोळीला बोदवडच्या तरुणांनी पकडले. यावेळी झालेल्या झटापटीत दोन तरुण जखमी झाले. ही घटना बोदवड येथे शुक्रवारी पहाटे तीन वाजता घडली. दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
जखमींवर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीन वाहनांसह आरोपी फरार झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक औरंगाबादकडे रवाना झाले आहे.