शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कामातील अनियमिततेवरून एमआयडीसीचे अधिकारी फैलावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 11:40 AM

उद्योजकांनी समस्यांचा पाढा वाचताच खासदार आमदारांनी खडसावले

जळगाव : एमआयडीसीमधील प्लॉट देणे असो की शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा पुरविणे असो, चिरीमिरी घेतल्या शिवाय तुम्ही कोणतेच काम करीत नाही. आपल्या कामाच्या पद्धतीत सुधारणा करा अशा सूचना देत उद्योजकांच्या अडीअडचणी वाढत असून आमच्या संयमाचा अंत पाहू नका अशी तंबी खासदार उन्मेष पाटील यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना गुरुवारी संवाद सभेदरम्यान दिली.औद्योगिक वसाहत परिसरातील उद्योजकांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी गुरुवारी जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने खासदार उन्मेष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खासदार पाटील आणि आमदार सुरेश भोळे यांनी क्षेत्रीय अधिकारी अमित भामरे यांच्या कारभारातील अनियमिततेबाबत झाडाझडती घेतली.गुरुवारी दुपारी तीन वाजता बाजार समितीच्या समोरील अजिंठा लॉन्स येथे ही सभा झाली. या बैठकीस उद्योग आघाडीचे कंवरलाल संघवी, अरुण बोरोले, चंद्रकांत बेंडाळे, किशोर ढाके, बिपिन पाटील, समीर साने, समीर राणे, नितीन इंगळे, एमआयडीसी क्षेत्रीय अधिकारी अमित भामरे, गिरी, जिल्हा उद्योग केंद्राचे साहेबराव पाटील, महावितरण, बीएसएनएल, एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, कामगार कल्याण, अग्निशामक यंत्रणा यांच्यासह विविध वीस विभागांचे अधिकारी तसेच उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यपद्धतीत बदल करा अन्यथा गंभीर दखल घेणारगेल्या पाच वर्षात विविध कामे करून एमआयडीसी मधील उद्योग वाढीसाठी प्रयत्न केला. मोठा निधी मंजूर करून आणला. मात्र अधिकाºयांनी आपल्या स्वार्थासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने कुठलीही सुसूत्रता ठेवली नाही. संवाद ठेवला नाही. त्यामुळे चांगले काम करूनही उद्योजक बांधवांची नाराजी आहे. तुम्ही अजूनही आपल्या कार्यपद्धतीत बदल करा अन्यथा मला गंभीर दखल घ्यावी लागेल असा इशारा आमदार सुरेश भोळे यांनी दिला.बुधवार, गुरुवारी अधिकारी मुख्यालयात थांबाएमआयडीसीतील अडीअडचणी बाबत अधिकाºयांना भेटण्यासाठी उद्योजक येतात, त्यावेळी अधिकारी भेटत नसल्याच्या तक्रारी उद्योजकांनी खासदार पाटील यांच्या समोर मांडल्या. त्यावर खासदार पाटील यांनी अधिकाºयांना जाब विचारला. यावेळी क्षेत्रीय अधिकारी भामरे निरुत्तर झाले. मुख्यालयात थांबून बुधवार, गुरुवार उद्योजकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी हजर राहवे, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या. यावेळी अनेक विषयांवर उद्योजक बांधवांनी आपले मत व्यक्त केले.

टॅग्स :Jalgaonजळगाव