अक्सा नगरातील बुध बाजार मनपाने उठवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:12 AM2021-06-10T04:12:05+5:302021-06-10T04:12:05+5:30

तगड्या पोलीस बंदोबस्तासह मनपाची कारवाई : फुले मार्केट बाहेर वाहने लावणाऱ्यांवर होणार कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील ...

Mercury Bazaar in Axa City was raised by Manpa | अक्सा नगरातील बुध बाजार मनपाने उठवला

अक्सा नगरातील बुध बाजार मनपाने उठवला

Next

तगड्या पोलीस बंदोबस्तासह मनपाची कारवाई : फुले मार्केट बाहेर वाहने लावणाऱ्यांवर होणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील अक्सा नगर परिसरात दर बुधवारी भरणारा बाजार मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने उठवून लावला. प्रशासनाने निर्बंध उठवले असले तरी आठवडे बाजाराला परवानगी दिलेली नाही. असे असतानादेखील बुधवारी अक्सानगर भागात सुमारे २५० विक्रेत्यांनी दुकाने टाकायला सुरुवात केली होती; मात्र त्याआधीच मनपा व पोलीस प्रशासनाच्या पथकाने जाऊन हा बाजार बसूच दिला नाही.

अक्सा नगर भागात कडक निर्बंध काळातदेखील अनेक वेळा हा बाजार भरला होता, तसेच या ठिकाणी जिल्हाभरातून अनेक विक्रेतेदेखील येत असल्याने कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता असते, तसेच कारवाई दरम्यान या ठिकाणी वाद निर्माण होण्याची शक्यता अधिक असल्याने बुधवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी व मनपा निर्मूलन विभागाच्या पथकाची संयुक्त कारवाई करण्यात आली. सकाळी १० वाजताच मनपा उपायुक्त संतोष वाहूळे यांच्या नेतृत्वाखाली मनपाचे पथक दाखल झाले होते. त्या घरीच अनेक विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. मनपा व पोलीस प्रशासनाचे पथक दाखल होताच दुकाने थाटलेल्या विक्रेत्यांनी आपले साहित्य जमा करून या ठिकाणाहून पळ काढला, तसेच पोलीस प्रशासनाचादेखील तगडा बंदोबस्त असल्याने या ठिकाणी कोणतेही विक्रेत्याने वादावादी न करता मनपा पथकाला सहकार्य केल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले. दुपारी दोन वाजतापर्यंत मनपाचे पथक या ठिकाणी तैनात करण्यात आले होते.

फुले मार्केटबाहेर वाहने लावल्यास होणार कारवाई

शहरातील महात्मा फुले मार्केट परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. तर फुले मार्केटमधील आतल्या भागात अनेक अनधिकृत हॉकर्स दुकाने थाटत असल्याने या ठिकाणीदेखील मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होत असते. यामुळे मनपा प्रशासन व वाहतूक विभागाने फुले मार्केट परिसराच्या बाहेर नो पार्किंग झोन जाहीर केला असून, आता बाहेर वाहने लावणाऱ्या वाहनधारकांवर गुरुवारपासून वाहतूक शाखेकडून कारवाई केली जाणार असल्याची माहिती मनपा उपायुक्त संतोष वाहूळे यांनी दिली आहे. तर फुले मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर लगाम घालता यावा यासाठी फुले मार्केटमधील सर्व व्यापाऱ्यांना आपली वाहने मार्केटमधील मोकळ्या जागेवर पार्क करण्याचा आदेश मनपा उपायुक्त यांनी दिला आहे. याबाबतची अंमलबजावणी गुरुवारपासून केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त यांनी दिली.

पिंप्राळ्यातील बाजारही हटवला; मात्र गल्लीत जावून बसला

बुधवारी शहरातील पिंप्राळा भागातदेखील आठवडे बाजार भरत असतो. जिल्हा प्रशासनाने निर्बंध पाठवल्यामुळे बुधवारी अनेक भाजीपाला विक्रेत्यांनी या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी गर्दी केली होती; मात्र त्याआधीच दुपारी तीन वाजता मनपाचे पथक या ठिकाणी दाखल झाल्यामुळे या बाजारातदेखील कोणत्याही विक्रेत्याला व्यवसाय करू देण्यात आला नाही. या भागात जरी मनपाने पथक तैनात केले होते तरी अनेक विक्रेत्यांनी परिसरातील गल्लीबोळात जाऊन दुकाने थाटल्याचे चित्र दिसून आले. निवृत्ती नगर, दादावाडी परिसर, अष्टभुजा नगर व मानराज परिसरात अनेक विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती, तसेच या ठिकाणी ग्राहकांचीदेखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

Web Title: Mercury Bazaar in Axa City was raised by Manpa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.