शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
2
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
3
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
4
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
5
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
6
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
7
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
8
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
9
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
10
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
11
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
12
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
13
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
14
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
15
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
16
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
17
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
18
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
19
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
20
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

मेहरूण तलाव बातमी जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:16 IST

गेल्या काही वर्षांपासून मनपा प्रशासनाच्या झालेल्या दुर्लक्षामुळे मेहरूण तलावाची जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहे. तलावात सोडण्यात येणारे ...

गेल्या काही वर्षांपासून मनपा प्रशासनाच्या झालेल्या दुर्लक्षामुळे मेहरूण तलावाची जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहे. तलावात सोडण्यात येणारे सांडपाण्याचे मिश्रण, अनियमित स्वच्छतेमुळे तलाव परिसरात जाणारा कचरा, तलावाचे आटणारे जलस्रोत, पाळीव प्राण्यांचा वापर, तलावात थेट वाहने धुणे आदी समस्यांमुळे तलावाचे वैभव नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहे. त्यामुळे मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी या समस्या पहिल्यांदा सोडविल्या पाहिजेत.

विजय वाणी

मी व आमचा मित्र परिवार गेल्या २० वर्षांपासून नियमित पहाटे मेहरूण चौपाटीवर फिरायला जातो. जळगावकरांना नैसर्गिक वातावरणात फिरण्यासाठी ते एकमेव ठिकाण आहे. मात्र, प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे येथे तयार करण्यात आलेल्या ऑक्सिजन पार्कमधील निम्मी झाडे वाळून गेली आहेत. तसेच या ठिकाणी आहे त्या झाडांची तोडणी होत आहे. मनपाचे फक्त सुशोभीकरणाकडे लक्ष आहे, समस्यांकडे मात्र दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे.

किशोर भुतडा

मेहरूण तलाव परिसरातच माझे घर असल्याने, नेहमी तलावाच्या चौपाटीवर सकाळी फिरायला जात असते. तलावात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे तलावाचे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होऊन तलावातील जलचर प्राणी व वनस्पती नष्ट होत आहे. त्यामुळे सांडपाण्याची समस्या मनपाने त्वरित मार्गी लावावी. तलावाचे सुशोभीकरण करण्याआधी सांडपाण्याचा प्रश्न सोडविल्यावरच तलावाचे अस्तित्व टिकून राहील.

डॉ. सुनीती बेंद्रे

तलाव परिसरात नेहमी टवाळखोर मुलांचा वावर राहत असल्यामुळे फिरण्यासाठी आलेल्या महिलांना भीती वाटते, तसेच अनेक ठिकाणचे पथदिवेही बंद आहेत. या ठिकाणी सुरक्षारक्षक नियुक्त करून टवाळखोरांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे सुरक्षारक्षक नियुक्त केला तर, या ठिकाणी होणारी वृक्षतोड थांबेल.

देवकी नारखेडे

सांडपाण्यामुळे तलावातील पाणी प्रदूषित होत असल्याबाबत, याची कल्पना मनपा प्रशासनाला व शहरातील लोकप्रतिनिधींनाही आहे. मात्र, त्यांनी इतक्या वर्षांत कधीही लक्ष दिले नाही. तलाव परिसरात गेल्या दोन ते तीन वर्षांत करोडो रुपये खर्च करून विविध प्रकारचे सुशोभीकरण करण्यात आले. मात्र, इतकाच पैसा जर सांडपाण्याच्या विल्हेवाटीसाठी केला असता, तर तलावाचे पाणी दूषित झाले नसते.

विजय नारखेडे