भुसावळात पोलिसाची चारचाकी लांबवली तर आरपीएफ कर्मचा:याचे घर फोडले

By Admin | Updated: May 29, 2017 13:22 IST2017-05-29T13:22:05+5:302017-05-29T13:22:05+5:30

भुसावळात चोर झाले पोलिसांवर शिरजोर

In the meanwhile, the policeman was stopped and the RPF employee broke his house | भुसावळात पोलिसाची चारचाकी लांबवली तर आरपीएफ कर्मचा:याचे घर फोडले

भुसावळात पोलिसाची चारचाकी लांबवली तर आरपीएफ कर्मचा:याचे घर फोडले

ऑनलाईन लोकमत

भुसावळ, दि.29- शहरातील हिरो होंडा शोरूम मागील मोरेश्वर नगरात चोरटय़ांनी पोलिसाचीच चारचाकी लांबवत रेल्वे सुरक्षा बलातील कर्मचा:याचे घर फोडत पोलिसांच्या गस्तीला आव्हान दिल़े 
मुंबई पोलीस दलातील कर्मचारी तथा मोरेश्वर नगरातील रहिवासी नितीन नारायण सपकाळे यांच्या घराचे काम सुरू असल्याने त्यांनी चारचाकी (एम़एच़01-सी़ए़8021) घराबाहेर लावली होती़ रविवारी मध्यरात्री चोरटय़ांनी संधी साधत चारचाकी लांबवली तसेच काही अंतरावरील यार्डातील आरपीएफ कर्मचारी प्रदीप अशोक इंगळे यांचे बंद घर फोडल़े नेमका काय ऐवज गेला हे कळू शकले नाही़ दुपार्पयत पोलीस घटनास्थळी पोहोचले नसल्याने गुन्हा दाखल झालेला नव्हता़

Web Title: In the meanwhile, the policeman was stopped and the RPF employee broke his house