शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

जळगावच्या बाजारात नवीन उडीद, मुगाची आवक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:47 PM

विजयकुमार सैतवालजळगाव : जळगावच्या बाजारपेठेत नवीन उडीद मुगाची आवक सुरू झाली असून चांगल्या मालाला व्यापाऱ्यांकडून भाव मिळत असला तरी शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याची शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत. शेवटच्या टप्प्यात पावसाची आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने उडीद व मुगाच्या दर्जावर परिणाम झाला असून त्या मालाला मात्र योग्य भाव मिळत नसल्याचे ...

विजयकुमार सैतवालजळगाव : जळगावच्याबाजारपेठेत नवीन उडीद मुगाची आवक सुरू झाली असून चांगल्या मालाला व्यापाऱ्यांकडून भाव मिळत असला तरी शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याची शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत. शेवटच्या टप्प्यात पावसाची आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने उडीद व मुगाच्या दर्जावर परिणाम झाला असून त्या मालाला मात्र योग्य भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, गहू, तांदूळ, डाळ यांना या आठवड्यात मागणी वाढली असली तरी त्यांचे भाव आठवडाभरापासून स्थिर आहे.सप्टेंबर महिन्यापासून बाजारात नवीन उडीद, मुगाची आवक सुरू होते. त्यानुसार यंदाही ही आवक सुरू झाली असून दररोज प्रत्येकी २५० ते ३०० क्ंिवटल उडीद व मुगाची आवक सुरू आहे. मात्र मुगाला शेवटच्या टप्प्यात आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने मुगाच्या दर्जावर परिणाम झाला आहे. काही माल बारीक असल्याने तर काही माल डागी असल्याने अशा मुगाला ३२०० ते ४००० रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. अशाच प्रकारे उडीदालाही २८०० ते ३००० रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. चांगल्या दर्जाच्या मुगाला ५००० ते ५२०० तर चांगल्या दर्जाच्या उडिदाला ४००० रुपये प्रती क्विंटल असा भाव मिळत आहे. जळगावच्या बाजारपेठेत जळगाव, धरणगाव तालुक्यासह अहमदनगर, चिखली, मेहकर, अकोला या भागातून मुगाची आवक होत आहे. उडिदाची जळगाव जिल्ह्यासह विदर्भ, कर्नाटकातून आवक सुरू आहे.शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षाभाद्रपद महिना सुरू झाल्याने उन्हाचाही चटका वाढला असून उडीद-मुगाची आवक चांगल्या प्रकारे सुरू झाली आहे. असे असले तरी बºयाच शेतकºयांनी आपला माल बाजारात न आणता ते शासकीय हमी भाव केंद्र सुरू करण्याची प्रतीक्षा करीत आहे. या केंद्रावर शासनाने जाहीर केलेला हमी भाव मिळण्याची आशा शेतकºयांना आहे. मात्र बराच माल डागी व बारीक असल्याने प्रतवारीनुसार शासकीय खरेदी केंद्रावर तो खरेदी केला जातो की नाही व त्यास योग्य भाव मिळतो की नाही याची चिंता शेतकºयांना लागून आहे.गहू, तांदूळ, डाळी स्थिरगेल्या आठवड्याच्या तुलनेत धान्याला मागणी वाढली असून मागणीनुसार धान्याची आवक सुरू असल्याने धान्य व डाळींचे भाव स्थिर आहेत. १४७ गहू २४०० ते २५०० रुपयांवर स्थिर असून लोकवन गव्हाचे भाव २३०० ते २४०० रुपये, शरबती गहू २५०० ते २६०० रुपये आणि चंदोसीचे भाव ३६०० ते ३८०० रुपयांवर स्थिर आहेत. बाजारपेठेत जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश व राजस्थानातून गव्हाची आवक सुरू आहे. तांदुळाचे भावदेखील स्थिर आहेत. नवीन उडीद व मुगाची आवक सुरू झाल्याने डाळींचे भाव कमी होतात की काय याकडे लक्ष लागून होते. मात्र आवक सुरू झाली असली तरी डाळींचे भाव स्थिर आहे. बाजारपेठेत मुगाची डाळ ६६ ते ७० रुपये प्रती किलोवर स्थिर असून उडीद डाळ ४८ ते ५२ रुपये प्रती किलो, तूरडाळ - ५६ ते ६० आणि हरभरा डाळ ४८ ते ५२ रुपये प्रती किलोने विक्री होत आहे.

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव