मेहुण्यासोबत गेलेल्या शालकाचा मेहरुण तलावात बुडून मृत्यू

By Admin | Updated: May 2, 2017 15:28 IST2017-05-02T15:28:02+5:302017-05-02T15:28:02+5:30

मेहरुण तलावाच्या गणेश घाटावरील घटना : दीड महिन्यात तिसरा मृत्यू

The man who accompanied Mehu, drowned in the lake and died in the lake | मेहुण्यासोबत गेलेल्या शालकाचा मेहरुण तलावात बुडून मृत्यू

मेहुण्यासोबत गेलेल्या शालकाचा मेहरुण तलावात बुडून मृत्यू

 जळगाव,दि.2- मेहुण्यासोबत मेहरुण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या संजय चंद्रदेव प्रजापती (वय 19 रा.सुप्रीक कॉलनी, जळगाव मुळ.रा.उत्तर प्रदेश) या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजता घडली. नवीन बांधकाम केलेल्या गणेश घाटावर ही घटना घडली आहे. दरम्यान, दीड महिन्यापूर्वीही याच तलावात अभियांत्रिकीच्या दोन विद्याथ्र्याचा बुडून मृत्यू झाला होता.

संजय प्रजापती हा मेहुणा राजू लालबिहारी प्रजापती (वय 28, रा.अयोध्या नगर, जळगाव), मित्र अमृत देवंद्र प्रजापती (वय 18) व आनंद लाला (वय 19) सर्व रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे चौघे जण सोमवारी दुपारी मेहरुण तलावात पोहण्यासाठी गेले होते. संजय याला पोहता येत नसल्याने तो गणेश घाटावरच बसून होता. सर्व जण पोहत असताना त्यालाही पाण्यात उतरण्याचा मोह सुटला. पाण्यात उतरताच खोल खड्डय़ात गेल्याने त्याचा पाण्यातच बुडून मृत्यू झाला.

Web Title: The man who accompanied Mehu, drowned in the lake and died in the lake