शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
3
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
4
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
5
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
6
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
7
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
8
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
10
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
11
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
12
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
13
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
14
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
15
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
16
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
17
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
18
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
19
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
20
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कोविड सेंटरमधील जेवणाचा दर्जा चांगला ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील मनपा कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील मनपा कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी महापौर जयश्री महाजन यांनी कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन स्वतः दर्जा तपासला. यामध्ये जेवणाची गुणवत्ता काही प्रमाणात चांगली असली तरी यामध्ये सातत्य कायम ठेवण्याच्या सूचना महापौरांनी ठेकेदाराला दिल्या आहेत.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील मनपा कोविड केअर सेंटरला भेट देत महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पाहणी केली. यावेळी नगरसेवक किशोर बाविस्कर, चेतन सनकत, कुंदन काळे, डॉ.विजय घोलप आदी उपस्थित होते. कोविड सेंटरमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाची तक्रार असल्याने महापौर जयश्री महाजन यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. मनपाचा कोविड केअर सेंटर मध्ये आलेल्या रुग्णांना चांगल्या प्रकारे जेवण देण्यात यावे, जेवणाचा गुणवत्तेत सातत्य कायम राहून याबद्दल कोणतेही रुग्णाची तक्रार यापुढे येऊ नये अशी सूचना महापौरांनी दिल्या आहेत.

अधिकाऱ्यांनी तक्रारीकडे लक्ष द्यावे

मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये असलेल्या रुग्णांशी महापौर, उपमहापौर यांनी चर्चा केली असता काही रुग्णांनी जेवणाच्या तिखट, मीठ चवबाबत तक्रार केली. कोविड केअर सेंटरमध्ये काहीही तक्रार असल्यास संबंधित डॉक्टर आणि समन्वय अधिकाऱ्यांना कळवावे असे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी केले. तसेच मनपा अधिकाऱ्यांनी रुग्णांच्या तक्रारीकडे लक्ष द्यावे आणि त्वरित मार्गी लावाव्या अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या.