शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

महाजनकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 5:51 PM

जामनेरच्या पालिका निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने मिळविलेले निर्भेळ यश हे राजकारणातील त्यांची ‘महाजनकी’ सिध्द करणारे आहे.

जामनेरच्या पालिका निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने मिळविलेले निर्भेळ यश हे राजकारणातील त्यांची ‘महाजनकी’ सिध्द करणारे आहे. महाजन हे जामनेर विधानसभा मतदारसंघातून सलग पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांची तालुक्यावर आणि त्यातील संस्थांवर मजबूत पकड आहे. परंतु २०१३ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत महाजन हे कार्यकर्त्यांवर विसंबून राहिल्याने भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. अडीच वर्षांनंतर पालिकेत सत्तापालट करुन महाजन यांनी पत्नी साधना महाजन यांना नगराध्यक्ष बनविले. मंत्रिपदाचा उपयोग करीत वेगवेगळ्या खात्यांचा मोठा निधी जामनेर शहरात आणला. अडीच वर्षात विकास कामांना गती आणत असतानाच राजकीय पातळीवर चातुर्याने रणनीती आखत प्रतिस्पर्धी पक्षाच्या मातब्बरांना भाजपात ओढले. ‘शतप्रतिशत’ विजयामागील ही रणनिती यशस्वी ठरली, त्या रणनितीबद्दल महाजन यांना गुण द्यावेच लागतील. कॉंग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना या राजकीय पक्षांना निवडणुकीच्या तोंडावर जाग आली आणि त्यांनी हालचाली सुरु केल्या. दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडीवरुन शेवटच्या दिवसापर्यंत घोळ सुरु होता. जिल्हा पदाधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडण्यापर्यंत कार्यकर्त्यांचा असंतोष पोहोचला होता. सेनेचा सर्व जागा लढविण्याचा निर्धार हवेत विरला आणि केवळ एक उमेदवार रिंगणात उतरला. राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ईश्वरलाल जैन यांचा गट महाजन यांना उघडपणे मदत करीत होता. राजकारण आणि युध्दात सर्व क्षम्य असते म्हणतात, त्याप्रमाणे महाजन यांनी खेळी केली आणि ती तडीस नेली. दोन्ही काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते हे केवळ धनंजय मुंडे आणि नबाव मलिक यांच्या संयुक्त सभेला व्यासपीठावर हजेरी लावण्यापुरता आले. उर्वरित काळात प्रचाराची धुरा सांभाळण्यापासून तर रॅलीत सहभागापर्यंत कुणाचाही सहभाग दिसून आला नाही, याचा अर्थ महाजन यांचा विजय आघाडीने गृहित धरला होता काय? मंत्रिपदाचा गैरवापर, पैशांचा महापूर, प्रशासनाची दडपशाही असे आरोप आता विरोधकांकडून होतील, पण निवडणुकीनंतरच्या आरोपांमध्ये तथ्य कमी आणि वैफल्य जास्त असते, हे सगळ्यांना ठावूक आहे. वर्षभरावर आलेली लोकसभा आणि त्यानंतर होणाºया विधानसभा निवडणुका लक्षात घेता हा निकाल भाजपाच्यादृष्टीने उत्साहवर्धक आहे. ‘संकटमोचक’ म्हणून महाजन अलिकडे ओळखले जाऊ लागले आहेत. किसान मोर्चा, अण्णा हजारे यांचे उपोषण या दोन्ही घटनांमध्ये महाजन यांची शिष्टाई यशस्वी ठरली. मुख्यमंत्र्यांचा त्यांच्यावर गाढ विश्वास आहे. तो महाजन यांनी सार्थ ठरविला. जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे नाराज असताना सरकार व पक्ष महाजन यांना बळ देत आहे, आणि त्यातून महाजन अधिक बलवान होत आहे, हादेखील निकालाचा अर्थ आहे.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनJamnerजामनेरBJPभाजपाJalgaonजळगाव