शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2024: भाजप प्रवेशाची भावजयीकडून आलेली ऑफर नणंदेने नाकारली; खडसेंमध्ये 'खटका'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 17:04 IST

Raver Lok Sabha Constituency: रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून रक्षा खडसे या मैदानात आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे या रक्षा खडसेंच्या विरोधात प्रचार करत आहेत.

जळगाव : आमदार एकनाथ खडसे हे भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत; परंतु त्यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी मात्र त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातच थांबणार असल्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यातच त्यांच्या वहिनी, भाजप खासदार रक्षा खडसे यांनी रोहिणी खडसे भाजपामध्ये याव्या यासाठी त्या प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते; परंतु भावजयीची 'ऑफर' नणंदेने फेटाळून लावली आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून रक्षा खडसे या मैदानात आहेत, तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे श्रीराम पवार हे मैदानात आहेत. श्रीराम पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे या रक्षा खडसेंच्या विरोधात प्रचार करत आहेत. अशा स्थितीत रोहिणी खडसे भाजपामध्ये याव्या, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रक्षा खडसे दोन दिवसांपूर्वी म्हणाल्या होत्या. रोहिणी खडसे यांनी मात्र गुरुवारी रात्री पत्रकारांशी बोलताना, भाजप प्रवेशाची ऑफर फेटाळून लावली.

काय म्हणाल्या रक्षा खडसे ?रोहिणी खडसे गेली काही वर्षांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी काम करत आहेत. त्यांना त्या पक्षाकडून महिला प्रदेशाध्यक्ष पददेखील मिळाले आहे; पण त्यांनी भाजपामध्ये येऊन काम करावे, अशी माझी इच्छा आहे.

काय म्हणाल्या रोहिणी खडसे ?रक्षा खडसे यांनी व्यक्त केलेली इच्छा ही त्यांची वैयक्तिक इच्छा आहे; पण मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातच कायम राहणार आहे. त्यांनी त्यांचे प्रयत्न करावे की नाही, ही त्यांची इच्छा आहे.

'घरवापसी'ला 'डेडलाइन' नाही!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी १५ दिवसात भारतीय जनता पक्षामध्ये परतण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याला दहा दिवस झाल्यानंतरही त्यांचा भाजपामध्ये प्रवेश होऊ शकलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपामधील अनेकांचा गोंधळ होताना दिसत आहे. खडसे यांनी मात्र त्यांच्या स्वगृही परतण्यासाठी कोणतीही 'डेडलाइन' नाही; परंतु भाजपामध्ये जाणे नक्की असल्याची भूमिका 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली. 

एकनाथ खडसेंनी गत ७ एप्रिल रोजी पक्षांतरासंदर्भात मौन सोडले होते. येत्या १५ दिवसांत भाजपामध्ये प्रवेश करणार, अशी माहिती त्यांनी दिली होती. ती मुदत संपत आली आहे. त्यामुळे प्रवेश नेमका होणार तरी केव्हा, अशी विचारणा 'लोकमत'ने केली असता ते म्हणाले, की १५ दिवसांत प्रवेश करणार हे ते बोलले होते; पण त्यासाठी 'डेडलाइन' वगैरे काही नाही. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४raver-pcरावेरbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४raksha khadseरक्षा खडसेeknath khadseएकनाथ खडसेRohini Khadseरोहिणी खडसे