शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी गिरवणार लोकशाही व निवडणुकांचे धडे

By admin | Updated: June 13, 2017 10:58 IST

निवडणूक आयोगाकडून उमविला पत्र : यंदापासून ‘लोकशाही निवडणूक व सुशासन’ विषय अभ्यासक्रमात

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.13 - जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची ओळख आहे. त्यामुळे विद्याथ्र्याना भारतीय लोकशाही निवडणूक प्रक्रियेची माहिती महाविद्यालयीन काळातच मिळावी यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून महाविद्यालयातील प्रत्येक शाखेतील पदवीच्या पहिल्या वर्षासाठी ‘लोकशाही निवडणूक व सुशासन’ हा अभ्यासक्रम अनिवार्य करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतचे पत्र उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला गेल्या आठवडय़ात प्राप्त झाले.
भारतीय लोकशाही पध्दतीचा अभ्यासासाठी प्राथमिक व माध्यमिक  अभ्यासक्रमात नागरिकशास्त्र हा विषय देण्यात आला आहे. मात्र  विद्याथ्र्याकडून या विषयाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. तसेच प्रत्यक्ष मतदानाचा हक्क मिळाल्याशिवाय विद्याथ्र्याना भारतीय लोकशाहीबाबत फार काही माहिती  मिळू शकत नाही. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने पदवीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेणा:या विद्याथ्र्यासाठी ‘लोकशाही निवडणूक व सुशासन’ हा विषय अनिवार्य केला आहे. त्यासंबधी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला गेल्या आठवडय़ात निवडणूक आयोगाचे पत्र प्राप्त झाले. या विषयाअंतर्गत लोकसभा, विधानसभा निवडणुकांप्रमाणेच राष्ट्रपती निवडणूक प्रक्रिया, लोकसभेचे कामकाज याबाबत माहिती दिली जाणार आहे. 
प्रत्येक शाखेला शिकविला जाईल अभ्यासक्रम
भारतीय लोकशाही बाबत  कला शाखेतल्या विद्याथ्र्याना राज्यशास्त्र विषयाअंतर्गत ही माहिती उपलब्ध होवून जाते. मात्र इतर शाखेतील विद्याथ्र्याना भारतीय लोकशाही बाबत फारसी माहिती नसते. त्यामुळेच अभियांत्रिकी, फार्मसी, वाणिज्य, विज्ञानसह सर्व शाखांच्या अभ्यासक्रमात हा विषय अनिवार्य करण्यात आला आहे. हा विषय किती गुणांचा व परीक्षा कशाप्रकारे राहिल याबाबत विद्यापीठाला आदेश प्राप्त झाले नाहीत. पहिल्या वर्षासाठी या आधी पर्यावरण व जनरल नॉलेज हे विषय देखील अनिवार्य करण्यात आले आहेत.