शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
3
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
4
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
5
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
6
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
7
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
8
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
10
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
11
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
12
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
13
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
14
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
15
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
16
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
17
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
18
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
19
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
20
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी महिलेच्या पिशवीतून दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मुलाच्या घरी जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या वृद्ध महिलेच्या पर्समधून ३१ हजार रुपयांचे दागिने लंपास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मुलाच्या घरी जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या वृद्ध महिलेच्या पर्समधून ३१ हजार रुपयांचे दागिने लंपास झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्‍यात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

सुभद्राबाई तायडे या विसनजीनगरात पती पुंडलिक यांच्यासह वास्तव्यास आहेत. मुलगा दीपक हा द्वारकानगरात राहतो. त्यामुळे सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता तायडे दाम्पत्य मुलाची भेट घेण्‍यासाठी विसनजीनगरातून रिक्षाने निघाले. दरम्यान, पाच वाजेच्या सुमारास बजरंग बोगद्याजवळ रिक्षा नादुरुस्त झाली. त्यामुळे रिक्षाचालकाने तायडे दाम्पत्यास त्याच ठिकाणी उतरवून दिले. सुभद्राबाई यांनी कमरेला लावलेल्या पिशवीतून पैसे काढून रिक्षा भाडे दिले व पिशवीत ठेवलेले सोन्याचे दोन ग्रॅमचे मणी, ४ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, २ भाराचे चांदीचे जोडवे पाहिले असता, त्यांना ते गायब झालेले दिसून आले.

पोलीस ठाण्‍यात घेतली धाव

काही वेळातच चालक हा रिक्षा दुरुस्त करून तेथून निघून गेला. तायडे दाम्पत्याने दुसरी रिक्षा करून मुलाचे घर गाठले व संपूर्ण हकीकत सांगितली. रिक्षात आणखी तीन महिला होत्या, अशीही माहिती त्यांनी दिली. सोमवारी सायंकाळी लागलीच सुभद्राबाई यांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार ३१ हजार रुपये किमतीचे दागिने चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.