भुसावळ : आम्ही करीत असलेल्या अवैध धंद्यासंदर्भात पोलिसांना खबर देत असल्याच्या संशयावरून जाफरी मुकद्दरअली सलीमअली (रा.ख्वाजा नगर, अमळनेर) याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात जाफरी हा गंभीर जखमी झाला असून, त्याला साकेगाव येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. १८ रोजी ही घटना घडली. यासंदर्भात २० रोजी फिर्याद दिल्याने दोन आरोपींविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सूत्रांनुसार, फिर्यादी जाफरी मुकद्दरअली सलीमअली हा अमळनेर येथून भुसावळ येथे आला होता. १८ रोजी तो इराणी मोहल्ल्यातील मशिदीमधून नमाज पढून बाहेर पडला. मोटारसायकलला किल्ली लावत असताना अचानक आरोपी मोहम्मद लियाकत अली इराणी व त्याची बहीण उबल बनी लियाकत अली उर्फ डुडी रा. इराणी वस्ती, भुसावळ यांनी चाकूने वार केला. यात त्याच्या उजव्या खांद्याजवळ व उजव्या बाजूस गंभीर जखमा झाल्या. जखमी असताना त्यास गोदावरी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. बाजारपेठ पोलिसांनी २० रोजी सकाळी त्याचे जाबजबाब घेतले व दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.दरम्यान, आरोपी मोहम्मद इराणी रा.ईराणी वस्ती, भुसावळ याच्याविरुद्ध जळगाव, अमळनेर येथे महिलांच्या गळ्यातील साखळी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले.
अवैध धंद्यांची माहिती दिल्याच्या संशयावरून चाकू हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 16:10 IST
अवैध धंद्यासंदर्भात पोलिसांना खबर देत असल्याच्या संशयावरून जाफरी मुकद्दरअली सलीमअली याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला आहे.
अवैध धंद्यांची माहिती दिल्याच्या संशयावरून चाकू हल्ला
ठळक मुद्देभुसावळातील घटनाजखमी अमळनेरातील