शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सहा लाखांच्या खंडणीसाठी अमळनेर येथे डॉक्टरचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 15:49 IST

दोनजण ताब्यात, दोघे फरार

-अमळनेर : सहा लाख रुपये खंडणीसाठी शहाद्याच्या दातांच्या डॉक्टरचे अपहरण करून डांबून ठेवून पिस्तूल लावून चौघांनी धमकावले. ही घटना शनिवारी घडली. अमळनेरच्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर यातील २ आरोपी फरार झाले आहेत.शहादा येथील विजय नगरचे रहिवासी दंतवैद्यक विजय रघुवीर गोसावी गावोगावी फिरून आयुर्वेदीक दंतमंजन विक्री, दात सफाई, कवळी बसविण्याचे काम करतात. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अरविंद रवींद्र बि-हाडे (वय २०) आणि महेंद्र सीताराम मोरे (४०) यांना विद्याविहार कॉलनीतून १७ रोजी रात्री १० वाजता ताब्यात घेतले. पिस्तूल लावणारे २ मुख्य आरोपी फरार झाले आहेत. चारही आरोपींविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर करीत आहेत.याबाबत सविस्तर वृत्त असे, शहादा येथील दंतजवैद्यक गोसावी गावोगावी फिरून व्यवसाय करून उदरनिर्वाह भागवितात. गेल्या आठ दिवसांपासून अंजली पटेल नावाची महिला मोबाईलवरून त्यांना फोन करून तिच्या वडिलांचे दात बसविण्यासाठी येथील प्रताप कॉलॉनीमधील तिच्या घरी बोलवत होती.वडिलांचे दोन त तिन नविन दात बसविणे आहे तरी तुम्ही अमळनेर येथे येवुन जा बाबत सागंत होती. सदरह महिलेने १६ आॅगस्ट रोजी मोबाईलवर फोन केला असता गोसावी यांनी तिला अमळनेर येथे येण्यासाठी होकार दिला. १७ रोजी गोसावी हे त्यांच्या कार (क्रमांक एम.एच.१९-सीयू-७१५५)ने त्यांच्या मावशीचा मुलगा तुषार जलाल गीर गोसावी याच्यासह अमळनेर शहरातील अ‍ॅक्सिस बँकेजवळ सकाळी १० वाजता पोहचले. त्यांनी अंजली पटेल नामक महिलेस तिच्या मोबाईलवर फोन करुन येथे पोहचल्याचे सांगितले. त्या महिलेने तिचा भाऊ विनोद यास घेण्याकरीता पाठवित असल्याचे फोनवर सांगितले. गोसावी त्यांच्या भावासह अ‍ॅक्सीस बँकेजवळ थांबले. त्यावेळी त्यांच्आ जवळ दोनजण आले व त्यांनी अंजली हिने पाठविल्याचे सांगितले. त्यानंतर गोसावी यांनी त्या दोघांना कारमध्ये बसविले. दोघांनी गोसावी यांना शहरातील विध्याविहार कॉलनी मधील एका घरी नेले. त्यानंतर अचानक घराचा दरवाजा बंद केला. तिथे आणखी दोनजण आले. त्या चौघांनी पोलीस असल्याचे सांगून गोसावी व त्यांचा भाऊ तुषार यास मारहाण केली. मारहाणीचे कारण विचारले असता, तू एका व्यक्तीचे दात बसविल्यामुळे तो इसम दगावलाआहे. त्यामुळे तुला मारहाण करण्यास आमच्या साहेबांनी सांगीतले आहे, असे चौघांनी सांगितले. येथून सुटका करायची असेल तर साहेबांना सहा लाख रुपये दे आणि आम्हा चार जणांना वेगळे पैसे दे. नाहीतर तुला व तुझ्या भावाला मारुन टाकू, अशी धमकी कपाळावर पिस्तूल ठेवत त्यांनी दिली.तेव्हा घाबरून गोसावी यांनी येथील बहिणीकडून पैसे घेऊन देण्याचेच कबूलही केले. गोसावी यांचे मेहुणे दिनेश कोठारी यांनी पैसे घेऊन येतो, असे मोबाईलवरून सांगितले. त्यावेळी त्या चौघांपैकी एकाने त्यांचा फोन हिसकावून घेतला. त्यांना घरातच डांबून ठेवले. दोघांचे मोबाईल, दोन एटीएम कार्ड व गोसावी यांच्याकडील ३ हजार तर तुषार यांच्यातडील ५ हजार जबरीने हिसकावून घेतले. त्यानंतर एकाने तुषार यांना एका स्कुटीवर बसवून नेले. त्यायनंतर गोसावी हे कसेबसे इतरांच्या तावडीतून सुटून पळून गेले. शहरात लपून त्यांनी मेहुणे कोठारी यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. शनिवारी दुपारी एक वाजता गोसावी यांनी मेहुणे व नातेवाइकांसह येथील पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. तेव्हा गोसावी यांचा मावस भाऊ तुषार हा देखील पोलीस स्टेशनला येऊन पोहचला.