शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्ज मागे घेऊन अमोल किर्तीकरांना बिनविरोध निवडून आणण्याचा कट होता; भाजपचा गजानन किर्तीकरांवर आरोप
2
सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड आमदार पी. एन. पाटील यांचे निधन, काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला
3
आजचे राशीभविष्य: शेअर्समधून धनलाभ, नशिबाची साथ; आगळा-वेगळा अनुभव देणारा दिवस
4
दुष्काळावर उपाययोजना करायच्या आहेत; आचारसंहिता शिथिल करा, राज्य सरकारची निवडणूक आयोगाला विनंती 
5
बाबो! आरोपीला 'वाचविण्यासाठी' पोलिसांची जीप एम्सच्या चौथ्या मजल्यावर; सगळ्या वॉर्डांतून फिरली
6
२०१० नंतर ४२ प्रवर्गांना दिलेले ओबीसी आरक्षण अवैध; कोलकाता हायकोर्टाचा निर्णय; लाभार्थ्यांना फटका नाही
7
‘बाळ’ जाणार बालसुधारगृहात; बालहक्क न्यायालयाने जामीन केला रद्द, तेथे १४ दिवस राहणार
8
जाती-धर्माच्या आधारावर निवडणुकीत प्रचार टाळा; आयोगाने दिला भाजप, काँग्रेसला सल्ला
9
मातोश्रीच्या ‘लाचार श्री’ना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवा; कीर्तिकर यांची हकालपट्टी करण्याची मागणी 
10
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
11
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
12
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
13
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
14
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
15
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
16
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
17
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
18
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
19
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
20
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...

खान्देशी वांग्यांची विदेशवारी, दररोज २० टन वांग्याचे भरीत फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:23 PM

थंडी वाढल्याने मागणी वाढली

ठळक मुद्देनाशिक, पुण्यातही भरीत सेंटरतजेलदार वांग्यांना मागणी

विजयकुमार सैतवालजळगाव : गुलाबी थंडी जाणवू लागताच भरीताच्या वांग्यांनाही मागणी वाढू लागली असून तयार भरीताची विक्री वाढली आहे. जळगावातून दररोज सुमारे २० टन भरीताच्या वांग्यांची विक्री होत असून जिल्ह्यासह राज्यभरात येथून वांगे तसेच तयार भरीत रवाना होत आहे. इतकेच नव्हे येथील प्रसिद्ध वांगे अमेरिकासह इतर देशातही नातेवाईकांकडे पाठविण्यात येत आहेत.जळगाव जिल्ह्यातील केळीसह भरीताचे वांगेही प्रसिद्ध आहेत. त्यात हिवाळ््यामध्ये जास्त मागणी असते ती भरीताच्या वांग्यांना. जळगाव जिल्ह्यातील वातावरण व जमीन वांग्यांसाठी पोषक असल्याने त्यांची जी विशिष्ट चव आहे, ती इतरत्र कोठेही मिळत नाही. त्यामुळे या वांग्यांना जास्त मागणी असते व ते येथेच मोठ्या प्रमाणात पिकविले जातात.गेल्या काही वर्षापासून पावसाळ््यामध्येच भरीताचे वांगे बाजारात येऊ लागले आहेत. मात्र त्यांची खास चव लागते ती हिवाळ््यामध्ये. त्यामुळे थंडी वाढू लागली की या वांग्यांचीही मागणी वाढते.वांग्यांची आवक वाढलीजळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यातील बामणोद, भालोद, पाडळसे, जळगाव तालुक्यातील असोदा, भादली, ममुराबाद, इदगाव, कानळदा, रावेर तालुका तसेच वरणगाव, बोदवड तालुक्यांमध्ये भरीताच्या वांग्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यात आता जामनेर तालुक्यातही काही भागांमध्ये भरीताच्या वांग्याची लागवड होऊ लागली आहे. सध्या जळगाव बाजार समितीमध्ये या वांग्यांची आवक वाढली असून दररोज २० टन वांग्यांची विक्री होत आहे.भरीत केंद्रांवर अधिक मागणीघरगुती भरीत करण्यासाठी तसेच हॉटेल चालकांकडून या वाग्यांची खरेदी होते. त्यात आता काही वर्षांपासून खास भरीत सेंटरही सुरू झाल्याने तेथे मोठ्या प्रमाणात वांग्यांना मागणी असते. जळगाव शहरात ५० च्यावर भरीत सेंटर आहेत. त्यामुळे या भरीत सेंटरवर वांग्यांना मोठी मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सध्या घरी भरीत करण्यासह तयार भरीताला पसंती असल्याने त्याची विक्री वाढली आहे.भरीत पार्ट्यांना प्रारंभजळगाव जिल्ह्यात हिवाळ्यात भरीत पार्ट्या मोठ्या प्रमाणात केल्या जातात. त्यास सुरुवात झाली असून सध्या घरी आलेल्या पाहुणे मंडळींना भरीताचा पाहुणचार केला जात आहे. या सोबतच लग्न असो अथवा कोणताही समारंभ तेथे इतर पदार्थांसह भरीताचा मेनू हमखास असतोच.तजेलदार वांग्यांना मागणीवांगे भाजल्यानंतर त्यामधून जास्त तेल सुटेल अशा वांग्यांना अधिक मागणी असते. यासाठी जळगाव जिल्ह्यातील बामणोद, असोदा, भादली या भागातील वांगे प्रसिद्ध आहेत. असोदा येथे तर पिढ्यांपिढ्यांपासून भरीताच्या वांग्यांची शेती केली जात आहे.राज्यभर दरवळजळगावसह खान्देशासह नाशिक, पुणे येथेही भरीत सेंटर सुरू झाले आहेत. या सोबतच मुंबई, डोंबविली, कल्याण, गोरेगाव येथेही भरीताचे वांगे पोहचत आहे. पुणे येथे पिंपरी, चिंचवड, सांगवी या भागात खान्देशातील मंडळी मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असल्याने तेथे जळगावातून ट्रॅव्हल्सद्वारे वांगे पाठविले जातात व तेथील बाजारातही खान्देशी भरीताचे वांगे दिसू लागले आहेत.भरीताच्या वांग्यांची विदेशवारीजळगाव जिल्ह्यातील अनेक मंडळी अमेरिका तसेच इतर देशांमध्ये वास्तव्यास आहे. ही मंडळी हिवाळ््यामध्ये येथे आली अथवा येथील नातेवाईक त्यांच्याकडे गेले तर सोबत हमखास वांगे अथवा भरीत घेऊन जात असतात.भौगोलिक मानांकन; १५० देशांमध्ये वांग्यांच्या निर्यातीचा मार्ग मोकळाभरीताचे वांगे दोन रुपये प्र्रति किलोपर्यंत घसरतात. त्यामुळे उत्पादकांना मोठा फटका बसतो. यासाठी या वांग्यांना रास्त भाव मिळावा म्हणून जळगाव तालुक्यातील असोदा येथील नवनिर्मिती शेतकरी मंडळाच्या वतीने यासाठी प्रयत्न केले जात असून या मंडळाने या वांग्यांना भौगोलिक मानांकन (जीआय) मिळविले आहे. यामुळे १५० देशांमध्ये वांग्यांच्या निर्यातीचा मार्ग मोकळा होणार असून त्यास भाव मिळण्यासही मदत होऊ शकेल.उशिरा आगमनयंदा पाऊस उशिरा झाल्याने भरीताच्या वांग्याचे उत्पादनही लांबणीवर पडले. परिणामी दरवर्षापेक्षा यंदा बाजारात भरीताचे वांगे उशिरा आल्याचे वांगे उत्पादकांनी सांगितले. सध्या या वांग्याचे होलसेलचे भाव १५ रुपये प्रति किलो आहे तर किरकोळ बाजारात ३० रुपये प्रती किलोने वांगे विक्री होत आहेत. भरीत सेंटरवर १२० रुपये प्रती किलो तयार भरीत मिळत आहे.असोदेकरांना रोजगार, मात्र शेंडे आळीने वाढविली चिंताअसोदा येथे तर खास तुरकाठ्यांवर (काड्यांवर) भरीताचे वांगे भाजून मिळत असून तेथून कच्चे भरीत घेऊन जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे असोदेकरांना एक चांगला रोजगार या वांग्यांनी मिळून दिला आहे. मात्र या वांग्यांवर पडणाºया शेंडे आळीच्या प्रादुर्भावाने चिंता वाढविली असून त्याच्याप्रतिबंधासाठी उपाययोजना करण्याचीही मागणी नवनिर्मिती शेतकरी मंडळाने केली आहे.जळगाव जिल्ह्यातील पूरक वातावरणामुळे येथील वांग्यांना विशिष्ट चव असते. सध्या त्यांची आवक वाढण्यासह मागणीही वाढली आहे.-किशोर चौधरी, वांगे उत्पादक, असोदा

टॅग्स :vegetableभाज्याJalgaonजळगाव