शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात पुजा:याची दुचाकी जाळली

By admin | Updated: June 20, 2017 16:16 IST

शाहू नगरातील घटना : सूड भावनेतून कृत्य केल्याचा संशय

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.20 : शाहू नगरातील दक्षिण मुखी प्राचीन तपस्वी हनुमान मंदिराचे पुजारी रामबालकदास सरजुदास त्यागी (वय 27, मुळ रा.घोडास, राजस्थान) यांची तीस हजार रुपये किमतीची दुचाकी मंगळवारी पहाटे अज्ञातांनी जाळली. तर घोडय़ाला सिमेंट खावू  घालण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. 
रामबालकदास त्यागी 2004 पासून शाहू ुनगरातील तपस्वी हनुमान मंदिरात पुजारी आहेत तर जवळच असलेल्या गोशाळेचे देखभाल करतात. तर मंदिराच्या ट्रस्टतर्फे बांधण्यात आलेल्या निमखेडी येथील गोशाळेची देखील देखभाल त्यागी करतात. सोमवारी रात्री 10.30 वाजता त्यागी हे निमखेडी शिवारातील गोशाळेतून गाईंचे दूध घेऊन दुचाकीने (एम.एच.19.सीजी.2214) शाहू नगरातील मंदिरात आले. शेजारी असलेल्या व्यायाम शाळेजवळ दुचाकी लावून ते घरात गेले.  
घोडय़ालाही सिमेंट खावू घालण्याचा प्रय}
गायीला वासरु होणार असल्याने त्यागी हे पुन्हा त्यांच्या घोडय़ावर बसून रात्री निमखेडी येथील गोशाळेसाठी निघून गेले. त्याच दरम्यान मध्यरात्री 2 ते 3  वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी व्यायाम शाळेजवळ उभी असलेली दुचाकी जाळून टाकली. मंगळवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास त्यागी निमखेडी येथून घरी शाहू नगरात पोहचले असता त्यांना त्यांची मोपेड दुचाकी जळून खाक झाल्याचे दिसले.त्यांनी लागलीच मंदिरातील अन्य पुजारींना घटनेची माहिती दिली आणि घरा शेजारी राहणारे भगवान वारूळकर यांना विचारपूस केली असता त्यांनी घटनेबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. दरम्यान, घोडय़ालाही कोणीतरी सिमेंट खावू घालण्याचा प्रय} केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यागी यांनी लागलीच शहर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली.