शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon Teacher Suicide: खळबळजनक! जळगाव येथील एका शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 15:20 IST

Jalgaon Teacher Suicide In School: शाळेच्या मधल्या सुटीनंतर मुले वर्गात परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे एका शिक्षकाने शाळेच्या मधल्या सुट्टीत वर्गातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना पाचोरा येथील सुपडू भादू पाटील शाळेत बुधवारी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास घडली.  शाळेच्या मधल्या सुटीनंतर मुले वर्गात परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

 रवींद्र भरत महाले (वय, ४२) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.महाले हे आपली पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगीसह पाचोरा येथील दहीगाव संत येथे वास्तव्यास होते. मात्र, आज शाळेच्या मधल्या सुट्टीदरम्यान विद्यार्थी प्रांगणात खेळत असताना रवींद्र महाले यांनी वर्गात गळफास लावून आत्महत्या केली. मधली सुट्टी संपल्यानंतर विद्यार्थ्यांना महाले गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर त्यांनी इतर शिक्षकांना याबाबत माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. महाले यांनी आत्महत्या का केली? याबाबत अद्याप कोणताही माहिती समजू शकलेली नाही. परंतु, मानसिक तणावातून आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

टॅग्स :PachoraपाचोराMaharashtraमहाराष्ट्रTeacherशिक्षकCrime Newsगुन्हेगारी