रस्त्यांची मालकी बदलल्याच्या विरोधात जळगावात सह्यांची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2017 13:40 IST2017-04-27T13:40:27+5:302017-04-27T13:40:27+5:30

राज्य शासनाने जळगावातील दारू व्यावसायिकांना फायदा व्हावा यासाठी ६ रस्त्यांची मालकी बदलली.

Jalgaon sectarian campaign against changing ownership of roads | रस्त्यांची मालकी बदलल्याच्या विरोधात जळगावात सह्यांची मोहीम

रस्त्यांची मालकी बदलल्याच्या विरोधात जळगावात सह्यांची मोहीम

>ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 27 - राज्य शासनाने जळगावातील दारू व्यावसायिकांना फायदा व्हावा यासाठी ६ रस्त्यांची मालकी बदलली. या निर्णयाच्या विरोधात जळगाव फर्स्ट या संस्थेतर्फे २८ रोजी शहरात सह्यांची मोहीम राबवण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
 
या बैठकीला जळगावातील अनेक सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, रस्त्यांची मालकी बदलल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने २६ एप्रिल रोजी राज्य शासनाला फटकारले होते. आता याप्रकरणी ४ मे रोजी सुनावणी होणार आहे.
 

Web Title: Jalgaon sectarian campaign against changing ownership of roads