Jalgaon Crime: अल्पवयीन मुलीसोबत ओळख करून तुझ्या वडिलांना मारून टाकेन अशी धमकी देत १३ वर्षीय मुलीवर २७ वर्षीय तरुणाने अत्याचार केला. ही धक्कादायक घटना १९ फेब्रुवारी रोजी जळगावच्या शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात घडली. याप्रकरणी दीपक रतीलाल कोळी (वय २७) याच्याविरुद्ध पोक्सोतंर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घराशेजारी दीपक कोळी हा वेल्डींगचे काम करण्यासाठी आला होता. त्याने या मुलीसोबत ओळख निर्माण केली. त्यानंतर तिच्या वडिलांना मारून टाकेन अशी धमकी देत मुलीवर अत्याचार केला.
मुलीला चालताना त्रास होत असल्याचे लक्षात आल्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी तिच्या वडिलांनी तिच्याकडे विचारणा केली. त्यावेळी पीडित मुलीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला.
याविषयी कुटुंबीयांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दीपक कोळी याच्याविरुद्ध पोक्सोतंर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक साजीद मन्सुरी करीत आहेत.
Web Summary : A 27-year-old man in Jalgaon threatened to kill a 13-year-old girl's father and then raped her. The crime occurred in the Shani Peth area. Police have arrested the accused, Deepak Koli, and charged him under the POCSO Act.
Web Summary : जलगाँव में एक 27 वर्षीय व्यक्ति ने 13 वर्षीय लड़की के पिता को जान से मारने की धमकी दी और फिर उससे बलात्कार किया। अपराध शनि पेठ इलाके में हुआ। पुलिस ने आरोपी दीपक कोली को गिरफ्तार कर पोक्सो एक्ट के तहत मामला दर्ज किया है।