Jalgaon: जळगावात अंगावर वीज पडून शेतमजूर जागीच ठार
By चुडामण.बोरसे | Updated: May 16, 2025 22:04 IST2025-05-16T22:03:05+5:302025-05-16T22:04:50+5:30
Jalgaon Lightning: जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे अंगावर वीज पडून शेतमजूर जागीच ठार झाला.

Jalgaon: जळगावात अंगावर वीज पडून शेतमजूर जागीच ठार
चुडामण बोरसे, लोकमत न्यूज नेटवर्क: जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे अंगावर वीज पडून शेतमजूर जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घडली. शरद रामा भिल (वय, ३५) असे या ठार झालेल्या शेतमजुराचे नाव आहे. तो शुक्रवारी शेतात कांदे काढायला गेला होता. सायंकाळी वादळासह पाऊस सुरु झाल्याने तो घरी परतत होता. त्याचवेळी त्याच्या अंगावर वीज कोसळली आणि तो जागीच ठार झाला. शरद हा खर्ची येथील जावई होता.