Jalgaon Breaking : जळगावातील एका फॅक्टरीत भीषण स्फोट, दोन कामगारांचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 14:46 IST2022-01-21T14:45:13+5:302022-01-21T14:46:36+5:30
या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, सुनसगाव रस्त्यावर दिया कॉपर मास्टर अलॉयज् नावाची फॅक्टरी आहे

Jalgaon Breaking : जळगावातील एका फॅक्टरीत भीषण स्फोट, दोन कामगारांचा होरपळून मृत्यू
जळगाव - जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील सुनसगाव रस्त्यावर असलेल्या एका फॅक्टरीत भीषण स्फोट होऊन दोन कामगार ठार झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडलीये. प्राथमिक माहितीनुसार, मृतांमध्ये काशिनाथ सुरवाडे (रा. खेडी रोड, जळगाव, खेमसिंग पटेल (रा. बेमतेरा, छत्तीसगड) यांचा समावेश आहे. घटनास्थळी नशिराबादसह भुसावळ पोलिसांनी धाव घेतली आहे.
या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, सुनसगाव रस्त्यावर दिया कॉपर मास्टर अलॉयज् नावाची फॅक्टरी आहे. या फॅक्टरीत ही दुर्घटना घडलीये. या फॅक्टरीत आज दुपारी एका ऑईलच्या टाकीला दोन मजूर वेल्डींग करत होते. त्यावेळी अचानक स्पार्किंग होऊन मोठा स्फोट झाला. त्यात काशिनाथ व खेमसिंग दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. स्फोटाच्या आवाजाने परिसरात मोठा आवाज झाल्याने अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
पोलीस अधिकार्यांची घटनास्थळी धाव-
या घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखेडे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनीही घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली.