शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव विमानतळावर रात्रीही विमान उतरविणे शक्य, प्रवाशांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 05:57 IST

जळगाव विमानतळावर रात्रीच्या वेळी विमान उतरविण्यासाठी आवश्यक असलेली इन्स्ट्रुमेंट फ्लाइट रुट (आयएफआर) ही सुविधा लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

- खलील गिरकरमुंबई : जळगावविमानतळावर रात्रीच्या वेळी विमान उतरविण्यासाठी आवश्यक असलेली इन्स्ट्रुमेंट फ्लाइट रुट (आयएफआर) ही सुविधा लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याबाबत नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडे (डीजीसीए) सुधारित अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यानुसार, २० डिसेंबरपूर्वी ही सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (एएआय)च्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.जळगावविमानतळावरील व्हीएफआर प्रणाली बदलून आयएफआर करण्यासाठी फेब्रुवारीमध्ये डीजीसीएकडे अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावेळी धावपट्टीवरील वैमानिकाला मार्गदर्शन करणाºया सिग्नल दिव्यांमध्ये सेकंडरी सर्किट बसविणे, विमान उतरविण्याच्या अ‍ॅप्रोच मार्गामधील उच्च क्षमतेची वीजवाहिनी बाजूला करणे, या मार्गामध्ये असलेली काही झाडे तोडणे यासह काही तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश डीजीसीएने दिले होते, तसेच अन्य काही आक्षेप नोंदविण्यात आले होते. त्यानंतर, सर्व आक्षेपांचे निराकरण करून, तसेच तांत्रिक बाबींची पूर्तता करून २० नोव्हेंबर रोजी नव्याने अर्ज दाखल करण्यात आला. आता सर्व बाबींची पूर्तता करण्यात आल्याने डीजीसीए आयएफआर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हिरवा कंदील दाखवेल आणि २० डिसेंबरपूर्वी ही सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.कधी मिळतेपरवानगी?व्हिज्युअल्स फ्लाइट रुटमध्ये विमान चालविताना वैमानिकाला किमान ५ हजार मीटर दृश्यमानता असणे गरजेचे आहे, तर इन्स्ट्रुमेंट फ्लाइट रुटमध्ये (आयएफआर) ही दृश्यमानता ३ हजार मीटर असली तरी चालते.सूर्यास्तानंतर दृश्यमानता कमी होत असल्याने व्हीएफआर प्रणाली लागू असलेल्या विमानतळांमध्ये विमान उतरविण्यास हवाई नियंत्रण कक्षाकडून परवानगी दिली जात नाही. मात्र, आयएफआर प्रणाली लागू असेल, तर ही परवानगी दिली जाते.खराब हवामानाचा फटकासध्या जळगाव विमानतळावर व्हिज्युअल्स फ्लाइट रुटद्वारे (व्हीएफआर) विमान उतरविले जाते. त्यामुळे केवळ सूर्योदय ते सूर्यास्त या कालावधीत विमान उतरविणे शक्य होते. काही वेळा खराब हवामान, अन्य विमानतळावरील वाढत्या वाहतुकीमुळे, जळगावात येणाºया विमानांना विलंब होतो. त्याचा फटका प्रवाशांना बसतो. विमान उतरवता येत नसल्याने विमानाला इतर विमानतळावर वळविले जाते. मात्र, आयएफआर ही सुविधा उपलब्ध झाल्यावर रात्रीच्या वेळी जळगाव विमानतळावर विमान उतरविणे शक्य होईल. त्यामुळे विमान वाहतूक वाढण्याचीही शक्यता आहे.

टॅग्स :AirportविमानतळJalgaonजळगाव