३६२ दिव्यांगबांधवांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:57 IST2021-02-05T05:57:46+5:302021-02-05T05:57:46+5:30

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दिव्यांग मंडळ येथे बुधवारी ३६२ दिव्यांगबांधवांची तपासणी करण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ...

Investigation of 362 disabled persons | ३६२ दिव्यांगबांधवांची तपासणी

३६२ दिव्यांगबांधवांची तपासणी

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दिव्यांग मंडळ येथे बुधवारी ३६२ दिव्यांगबांधवांची तपासणी करण्यात आली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दिव्यांग मंडळ अद्ययावत सुविधांसह कार्यान्वित झाले आहे. दिव्यांग मंडळांतर्गत दिव्यांग व्यक्तींना दर बुधवारी प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही सुरू झाली. सकाळी ८ वाजेपासून नावनोंदणी करण्यासाठी दिव्यांगबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली होती. दिवसभरात अस्थिव्यंग २६०, दृष्टिदोष २७, कान-घसा २५, मानसिक ३२, लहान मुलांचे १८, अशा विविध दिव्यांगत्व असलेल्या सुमारे ३६२ लाभार्थ्यांची तपासणी झाली. यावेळी दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष डॉ. मारुती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार यांच्यासह तज्ज्ञ डॉ. दीपक जाधव, डॉ. मिलिंद बारी, डॉ. प्रदीप कुमार, डॉ. अंजली सिंग, डॉ. दिलीप महाजन, कान, घसा डॉ. विनोद पवार, डॉ. योगेश गांगुर्डे यांनी दिव्यांगांची तपासणी केली. कर्मचारी गोपाल सोळंकी, चेतन निकम, आरती दुसाने, दत्तात्रय पवार, वाल्मीक घुले, विश्वजित चौधरी यांनी सहकार्य केले.

Web Title: Investigation of 362 disabled persons