शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रेचर न मिळाल्याने उचलून न्यावे लागले जखमीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महिनाभरापूर्वीच नॉन कोविड सुविधा सुरू झाली आहे. मात्र, आपत्कालीन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महिनाभरापूर्वीच नॉन कोविड सुविधा सुरू झाली आहे. मात्र, आपत्कालीन विभागात कमी बेड आणि स्ट्रेचरचा अभाव असल्याने काही गंभीर बाबी समोर येत आहेत. सोमवारी एका अपघातातील जखमी महिलेला स्ट्रेचर नसल्याने नातेवाईकांनी उचलून रुग्णालयात नेले तर विभागात बेड नसल्याने थेट खाली झोपविले. काही वेळाने स्ट्रेचर आणून महिलेला त्यावर ठेवण्यात आले.

दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आपत्कालीन विभागात मात्र बेडची संख्या कमी असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अचानक आपत्कालीन रुग्णांची संख्या वाढल्यास डॉक्टर, कर्मचाऱ्यांनाही पर्याय नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी अतिदक्षता विभाग आणि त्यातील साहित्य यामुळे गोंधळ वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याचीच प्रचिती सोमवारी आली. आपत्कालीन विभागात जागा नसल्याने महिलेला थेट खाली झोपविण्यात आले होते.

काही महिलांना एक्सरे रूमच्या बाजूला असलेल्या कक्षात हलविण्यात आले होते. अचानक रुग्ण आल्याने या ठिकाणी गोंधळ वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

रोजची ओपीडी

४५०

रुग्णालयात उपलब्ध स्ट्रेचर

आपत्कालीन विभागात २ स्ट्रेचर, २ व्हीलचेअर

अतिदक्षता विभागात प्रत्येकी १

कोट

स्ट्रेचर पुरेसे आहेत. मात्र, आपत्कालीन विभागाच्या पॅसेजमध्ये गर्दी नको म्हणून तेथे कमी ठेवलेले असतात. गरज पडल्यास तातडीने अन्य कक्षातून आणले जातात. आपत्कालीन विभागात अधिक बेड वाढविण्यासाठी नियोजन सुरू असून लवकरच सिकलसेलचा विभाग हलवून त्या ठिकाणी दोन किंवा तीन बेड वाढवायचे आहेत.

- डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय

फोटो २६ सीटीआर ०२