जळगावात वाढत्या थंडीसह रुग्णालयांमध्येही वाढली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:47 PM2018-12-28T12:47:37+5:302018-12-28T12:48:12+5:30

लहान मुलांसह मोठ्यांना सर्दी, खोकला, तापाची लागण

Increased chaos in the hospital with rising cold in Jalgaon | जळगावात वाढत्या थंडीसह रुग्णालयांमध्येही वाढली गर्दी

जळगावात वाढत्या थंडीसह रुग्णालयांमध्येही वाढली गर्दी

Next

जळगाव : डिसेंबर महिन्याला सुरुवात झाल्यापासून जळगावकरांना थंडी जाणवू लागली असून गेल्या काही दिवसांपासून पारा अधिकच घसरल्याने सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांनी शहरवासीयांना ग्रासले आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्येही गर्दी होऊ लागली असून उबदार कपडे घालण्यासह आहाराची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
आरोग्यासाठी हितवर्धक असलेल्या हिवाळ््याला सुरुवात झाली असून आरोग्यासाठी चांगल्या असलेल्या या ऋतूमध्ये काळजी घेतली नाही तर आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होतात. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने नोव्हेंबर महिन्यात फारसी थंडी जाणवली नाही. त्यामुळे दिवसा उष्ण व रात्री थंड अशा वातावरणामुळे अनेकांना व्हायरल फिव्हरचा त्रास झाला. त्यातून शहरवासीय सावरत नाही तोच अचानक तापमानात घट झाल्याने त्याचाही परिणाम जाणवू लागला आहे.
हिवाळा सुरू झाल्यावर तापमानात घट होऊन थंडीचे प्रमाण वाढते़ या दिवसात योग्य काळजी न घेतल्यास प्रारंभी सर्दी, खोकला होतो आणि नंतर ताप येतो़ हिवाळ््याच्या दिवसांमध्ये दवाखान्यात येणाऱ्या ५० टक्के रूग्णांना सर्दी, खोकल्याचा अधिक त्रास असतो़ औषधोपचाराने हा आजार बरा होतो़ मात्र त्या व्यक्तीला अशक्तपणा जाणवतो़ त्यामुळे जळगावकर हैराण झाले आहेत़ हा अशक्तपणा घालविण्यासाठी योग्य वेळ झोप, ताजे अन्न खाण्याची गरज आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. नागरिकांना सर्दी, खोकल्याच्या बरोबरीनेच अंगदुखीचा त्रास जाणवत आहे़
उबदार कपड्यांना मागणी
शहरातील कोर्ट चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागील जी.एस. ग्राऊंडचा एक भाग थंडीपासून संरक्षणासाठीच्या उबदार कपडे विक्रेत्यांना काही काळासाठी देण्यात आला आहे. या चौकात उबदार कपडे विक्रेत्यांमध्ये दरवर्षी येणाºया तिबेटीयन विक्रेत्यांची दुकाने अधिक आहे. स्वेटर, टोपी, मफलर, कान टोपीपासून हातमोजे व अन्य कपडे या ठिकाणी विक्रीसाठी विविध प्रकारात उपलब्ध आहेत. यावर्षी १० ते २० टक्के किंमती वाढल्या असल्याचे विक्रेते सांगतात. थंडी वाढल्याने आता या ठिकाणी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत असल्याचे दृश्य दिसून येत आहे.
अशी घ्या काळजी
- बाहेर पडताना उबदार कपडे घाला
- घरी असतानाही सुती कपडे घाला़
-गरम, ताजे पदार्थ खावेत़
-स्वच्छ पाणी प्यावे, मच्छरदानी वापरा़
-घराच्या आजूबाजूला अस्वच्छता पसरू देवू नका़
-थंड पदार्थ खाणे टाळा
-डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेवू नका़

वाढत्या थंडीमुळे सर्दी, खोकला व काही प्रमामात तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. योग्य काळजी घेतल्यास हे आजारा टाळता येतात. त्यासाठी उबदार कपडे वापरण्यासह आहाराबाबतही काळजी घेणे आवश्यक आहे.
- डॉ. डी.आर. जयकर, जनरल प्रॅक्टीशनर

Web Title: Increased chaos in the hospital with rising cold in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.