खडसे-महाजन वादात माझा सँडविच होतोय; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 22:50 IST2025-11-25T22:49:17+5:302025-11-25T22:50:14+5:30
प्रशांत भदाणे/जळगाव- केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंनी आमदार एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वादावर मोठे विधान केले आहे. एकनाथ खडसे ...

खडसे-महाजन वादात माझा सँडविच होतोय; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचे मोठे विधान
प्रशांत भदाणे/जळगाव- केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंनी आमदार एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वादावर मोठे विधान केले आहे. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या वादात माझा सँडविच होतोय, असे त्या म्हणाल्या. नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी चोपड्यात प्रचार रॅली काढण्यात आली होती. या प्रचार रॅलीदरम्यान त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
चोपडा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने शिवसेना शिंदे गटाशी युती न करता निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत शहरातील मुख्य भागात प्रचार रॅली करण्यात आली होती. या प्रचार रॅली दरम्यान रक्षा खडसेंनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
मंत्री रक्षा खडसे म्हणाल्या की, एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या दोघांमधील भांडणात माझे सँडविच होते, एकीकडे एकनाथ खडसे हे माझे सासरे तर गिरीश महाजन हे वडिलांसारखे आहेत. ते मला मुलगी मानतात. या दोघांमधील वाद कसे कमी होतील असाच प्रयत्न मी करते, असे त्यांनी सांगितले.
मुक्ताईनगर नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्ष माझ्यासोबत ताकदीने उभा आहे. त्यामुळे मुक्ताईनगरमध्ये भाजपचा नगराध्यक्ष होईल, असे देखील रक्षा खडसे यावेळी म्हणाल्या.