शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

अडचणीतून खडसे माग कसा काढणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 1:24 PM

मुक्ताईनगर : तालुक्यात पक्ष प्रबळ पण पक्षांतर्गत कलहाचे आव्हान

मतीन शेखमुक्ताईनगर : सत्ताधारी भाजपसाठी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ संवेदनशील मानला जात आहे. भाजपची पक्ष म्हणून भूमिका तर एकनाथराव खडसे यांची उद्विग्नतेची कोंडी फोडणारी ही विधानसभा निवडणूक राहील.जिल्ह्याला भाजपचा बालेकिल्ला बनविण्यास पाया रचणाऱ्या आणि भाजपचा गड असलेल्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार एकनाथराव खडसे यांची पक्षांतर्गत आप्तस्वकीयांकडून झालेली कोंडी, कट कारस्थानाने कथित भ्रष्टाचाराच्या आरोपातून त्यांना सोडावे लागलेले मंत्री पद या मुरब्ब नेत्याला ‘हमे तो अपनोने लुटा गैरो मे दम था’ मेरी कस्ती थी डुबी जहा पानी कम था’ अशा अवस्थेत आणून ठेवले आहे. जवळपास सर्वच आरोप व चौकशांमधून बाहेर पडलेले खडसे यांची पक्षांतर्गत होणारी घुसमट आणि त्यांच्या उद्विग्नतेला समर्पकपणे तोंड फोडण्यासाठी तोंडावर आलेली विधानसभा निवडणूक ही अंतिम संधी मानली जात आहे. पुराव्यानिशी आरोप करण्यात हातखंडा असलेले खडसे यांनी विधानसभेत शेवटच्या भाषणात आपल्याकडे अनेकांविरोधात पुरावे असल्याचे सूतोवाच केले; अंगावर आला त्याला शिंगावर घेतला असा त्यांचा स्वभाव आहे. परंतु अशी कोणती बाब आहे की खडसे आपला घात करणाऱ्यांवर ठेवणीतील अस्त्र वापरत नाही. दर वेळेस दिल्ली वारी करून खडसे शांत होतात खरे परंतु त्यांची खदखद सतत समोर येत असते आणि नेमकी हीच बाब तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्ष श्रेष्ठींसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.शिवसेनेचे आव्हान२०१४ च्या निवडणुकीत मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना लढत रंगली. एकनाथराव खडसेंविरुद्ध शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील अशी ही लढत होती. एरव्ही दशकापासूनची राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची छुपी युती या निवडणुकीत उघड झाली. अगदी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण पाटील यांची अनामत जप्त होण्याइतकी नामुष्की राष्ट्रवादी पक्षाला सहन करावी लागली. निकालाच्या आकडेवारीनंतर राष्ट्रवादीत अस्तित्व गमविल्याची ओरड झाली. आता राष्ट्रवादीला अस्तित्व सिद्ध करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.विधानसभेत बंडखोरीचे सावटभाजपकडून विधानसभा उमेदवारीबाबत खडसे अस्वस्थ आहे. मात्र शुक्रवारी रावेर येथे पक्षाच्या मेळाव्यात पक्ष तिकीट देवो अथवा ना देवो जनता आपल्या पाठीशी असा इशारा दिल्याने कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. खडसेंचे हे विधान पक्षावर दबाव आहे की बंडखोरीची पूर्वसूचना, हे लवकरच उघड होईल. २५ सप्टेंबर २०१४ ला युती तोडण्याची घोषणा भाजपने खडसे यांच्या तोंडी करवून घेतली आणि ते युतीचे खलनायक बनले युुती तुटल्याने येथून शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांना विधानसभेत शिवसेनेकडून विधानसभेची उमेदवारी मिळाली. तब्बल पाच वेळा विधानसभा निवडून आलेल्या एकनाथराव खडसे यांना सहाव्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी तुल्यबळ लढत दिली होती. शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे जाहीर सभा घेऊन निवडणुकीत रंग भरला होता. येथूनच चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढविला. चार पंचवार्षिक भाजपविरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणाºया या मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना असे स्वरूप प्राप्त झाले. यानिमित्ताने चंद्रकांत पाटील पुन्हा विधानसभा लढतील. प्रसंगी सेना भाजप युती झाली आणि परंपरेने ही जागा भाजपकडे असली तर चंद्रकांत पाटील बंडखोरी करतील, असा मत प्रवाह आहे. किंबहुना पाटील मतदारसंघात घेत असलेल्या मेहनतीने हे उघड आहे.तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिंतन आणि मंथनच्या बाहेर पडल्याचे दिसत नाही. पक्षाची सक्रियता फारशी नाही. मात्र नेत्यांकडून दावे दमदार होत आहेत. काँग्रेस पक्षाने मरगळ झटकली आहे. निवडक पदाधिकारी असले तरी ते लोकांपर्यंत जात आहे. वंचित बहुजन आघाडीदेखील कामाला लागली आहे. लोकसभेत मतदारसंघातून त्यांनी २० हजार मतांचा टप्पा पार केला होता.मतदारसंघात तीन पालिका, एक बाजार समिती, दोन पंचायत समित्या व जवळपास तीन चतुर्थांश वि.का. सोसायट्यांवर व ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व आहे. भाजप पेक्षा शिवसेना सतत निवेदने, आंदोलन व उपक्रम करून मतदारसंघात सक्रिय आहे.राष्ट्रवादीचे निवडणूक कार्यालय वजा पक्ष कार्यालय सुरू झाले आहे, तर काँग्रेसला कायमस्वरूपी कार्यालयाची व कार्यकर्त्यांची वाट पहावी लागत आहे.पक्षनिहाय इच्छुक उमेदवारभाजपाआमदार एकनाथराव खडसेअ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकरअशोक नामदेव कांडेलकरशिवसेना -चंद्रकांत पाटीलकॉँग्रेसउदय पाटील, डॉ. जगदीश पाटील, एस.ए. भोईराष्टÑवादी कॉँगेसअ‍ॅड. रवींद्र पाटील,विनोद तराळवंचित बहुजन आघाडीसंतोष बोदळे, नितीन कांडेलकर, संजय कांडेलकर

टॅग्स :ElectionनिवडणूकMuktainagarमुक्ताईनगर