भुसावळमध्ये हॉटेलवर दरोडा टाकून कॅश लुटली, सहा जणांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 11:56 IST2021-01-19T11:55:39+5:302021-01-19T11:56:27+5:30
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधीक्षक वाघचौरे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गोठला यांनी पाहणी केली.

भुसावळमध्ये हॉटेलवर दरोडा टाकून कॅश लुटली, सहा जणांविरुद्ध गुन्हा
जळगाव : जिल्ह्यातील भुसावळ शहरातील नॅशनल हायवेला लागून असलेल्या पंजाब खालसा हॉटेलवर सहा जणांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी, हॉटेलच्या कॅश काउंटरची तोडफोड करत रोख रक्कम घेऊन आरोपी पसार झाले. सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी, सहा जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधीक्षक वाघचौरे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गोठला यांनी पाहणी केली.