शहरं
Join us  
Trending Stories
1
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
4
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
5
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
6
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
7
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
8
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
9
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
10
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
11
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
12
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
13
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
14
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
15
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
16
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
17
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
18
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
19
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
20
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

'ब्रेक द चेन'मध्ये हॉटेल व्यवसाय आला ५ टक्‍क्‍यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या ब्रेक द चेनमध्ये हॉटेल व्यवसाय अडचणीत आला असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या ब्रेक द चेनमध्ये हॉटेल व्यवसाय अडचणीत आला असून, केवळ पार्सल सुविधा उपलब्ध असल्याने हा व्यवसाय ५ टक्‍क्‍यांवर आला आहे. ग्राहकी नसल्याने दररोज हॉटेलचालकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून, जळगाव शहरातील दोन हजारांवर कर्मचारी बेरोजगार झाले आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने त्याचा विविध व्यवसायांवर मोठा परिणाम होत आहे. गेल्या वर्षीदेखील अशीच परिस्थिती उद्भवल्याने लॉकडाऊनच्या काळात हॉटेल बंद राहिल्या होत्या. त्यानंतर त्यांना टप्प्याटप्प्याने व मर्यादा घालून व्यवसायाची परवानगी देण्यात आली. हळूहळू हा व्यवसाय सुरळीत होत असताना फेब्रुवारीच्या मध्यापासून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला व नागरिकांनीदेखील हॉटेलमध्ये जाणे टाळणे पसंत केले. त्यानंतर ५ एप्रिलपासून ब्रेक द चेन लागू केल्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंटमधून केवळ पार्सल सुविधेची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे हॉटेल व्यवसाय जवळपास ठप्प झाल्यातच जमा असल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.

पार्सल घेण्यासाठीही कोणी येईना

हॉटेलवर पार्सल सुविधेची परवानगी देण्यात आली असली तरी याठिकाणी पार्सल घेणाऱ्यांची संख्या कमीच आहे. बाहेर हॉटेलवर काही घेण्यासाठी आले असता पोलिसांकडून विचारणा होत असल्याने त्यापेक्षा अनेक जण बाहेर पडणे टाळत आहे. सोबतच संसर्गाची भीती मनात असल्याने अनेक जण पार्सल घेण्यासाठी येत नसल्याचे सांगण्यात आले. यात होम डिलिव्हरी करणाऱ्या काही कंपन्यांना परवानगी दिली असली तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत ही मागणीदेखील २५ टक्केच असल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.

मोठी आर्थिक ओढाताण

व्यवसाय नाही यामुळे हॉटेलमालक दडपणात आहे. त्यांना बँकांचे कर्ज, जागा भाड्याने घेतली असल्यास जागेचे भाडे, कर्मचाऱ्यांचा पगार असा खर्च सुरूच आहे. त्यामुळे हे सर्व गणित जुळविताना हॉटेल व्यावसायिकांची चांगलीच ओढाताण होत आहे.

कर्मचाऱ्यांच्या हाताला काम नाही

जळगाव शहरात जवळपास १६० लहान-मोठ्या हॉटेल असून, या ठिकाणी दोन हजार कर्मचारी कामाला आहे. मात्र या व्यवसायावर मर्यादा आल्याने सर्वच कर्मचाऱ्यांना काम मिळणे कठीण झाले आहे. हाताला काम नसले तरी अनेक वर्षांपासून हे कर्मचारी हॉटेलचालकाकडे असल्याने त्यांची मालकाकडून मदतीची अपेक्षा आहे. यात हॉटेलचालक मदतदेखील करत आहे, मात्र आवकच बंद असल्याने कुठपर्यंत मदत करणे शक्य होईल, असाही प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

हॉटेलची संख्या १६०

कर्मचारी २०००

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या ब्रेक द चेनमध्ये हॉटेल व्यवसाय ९० टक्क्यांहून अधिक ठप्प झाला आहे. यामुळे हॉटेलमालकांची आर्थिक अडचण होण्यासह कर्मचाऱ्यांचाही उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हॉटेल व्यावसायिकांवर कर्जाचे हप्ते, मासिक भाडे, कर्मचाऱ्यांचा पगार असा आर्थिक भार असून व्यवसाय पूर्ववत सुरू होण्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.

- संजय जगताप, सचिव, जळगाव जिल्हा हॉटेल ॲंड टुरिझम डेव्हलपमेंट असोसिएशन