शनीपेठ भागात दीड लाखाचा गुटखा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:18 AM2021-07-27T04:18:29+5:302021-07-27T04:18:29+5:30

पैलाड शनीपेठ भागात एका घरात बेकायदेशीररित्या गुटखा, तंबाखू साठवून विक्री केली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे याना ...

Gutkha worth Rs 1.5 lakh was seized in Shanipeth area | शनीपेठ भागात दीड लाखाचा गुटखा पकडला

शनीपेठ भागात दीड लाखाचा गुटखा पकडला

googlenewsNext

पैलाड शनीपेठ भागात एका घरात बेकायदेशीररित्या गुटखा, तंबाखू साठवून विक्री केली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे याना मिळल्यावरून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक राहुल लबडे, दीपक माळी, रवींद्र पाटील, महिला कॉन्स्टेबल नम्रता जरे याना पाठवले असता त्याठिकाणी संजय जगन्नाथ पाटील त्याच्या घरात गुटखा साठवून विक्री करीत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी त्याच्या घरातून ६२ हजार ६४५ रुपयांची ३३५ विमलची पाकिटे, ११ हजार ५५ रुपयांची ३३५ विमल जर्दाची पाकिटे, ५४ हजार रुपयांची सागर पानमसाल्याची ४५० पाकिटे, १३ हजार ५०० रुपयांची सुगंधित तंबाखूची ७५० पाकिटे, ५ हजार २०० रुपयांची २६ पाकिटे मिराज असा एकूण १ लाख ४६ हजार ४०० रुपयांचा माल जप्त केला असून आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध मानवी आरोग्यास अपायकारक, मूर्च्छा व नशा येणारे अन्नपदार्थ विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहेत.

260721\26jal_5_26072021_12.jpg

आरोपी व गुटखा, तंबाखू सह पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, राहुल लबडे. (छाया : अंबिका फोटो)

Web Title: Gutkha worth Rs 1.5 lakh was seized in Shanipeth area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.