शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

सोशल मीडियाच्या माहितीवरून अमळनेर येथे गावठी कट्टा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 6:03 PM

सोशल मीडियाच्या माहितीवरून पोलिसांनी सागर निंबा शेटे (वय २६, रा.शिरुड नाका, दत्त मंदिराजवळ, अमळनेर) यास शनिवारी रात्री गावठी कट्ट्यासह अटक केली.

ठळक मुद्देगुन्हेगारीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांची करडी नजरअमळनेरात एकास गावठी कट्ट्यासह अटक

संजय पाटीलअमळनेर, जि.जळगाव : सोशल मीडियाच्या माहितीवरून पोलिसांनी सागर निंबा शेटे (वय २६, रा.शिरुड नाका, दत्त मंदिराजवळ, अमळनेर) यास शनिवारी रात्री गावठी कट्ट्यासह अटक केली.जिल्ह्यात सोशल मीडियावर अफवा पसरवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर निगराणी ठेवताना पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांना व्हॉट्सअपवर गावठी कट्टे विक्री होत असल्याची माहिती मिळाली असून, त्यांनी जळगाव, अमळनेर आणि भुसावळ शहरात गावठी कट्टे पकडणे सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सागर शेटे यास पोलिसांनी अटक केली.पथकांनी उमर्टी (मध्य प्रदेश), चोपडा, अमळनेर, शिरपूर या भागात गावठी कट्ट्यांविषयी तपास केला. २३ रोजी अमळगाव जळोद रोडवरील अमळगाव गावाचे पुढे एक कि.मी. अंतरावर गुरुचरणसिंग आवसिंग बर्नाला (वय २१, रा.उमर्टी, ता.वरला, जि.बडवानी, मध्य प्रदेश) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचे दोन गावठी पिस्तूल मॅक्झिनसह जप्त केले. त्याच्याविरुद्ध मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्याकडून माहिती मिळाल्यावरून त्याने अमळनेर, भुसावळ, जळगाव शहरात कट्टे विकल्याची माहिती दिली होती. ८ रोजी अमळनेर शहरातील गलवाडे रोडवरील असोदा मटन हॉटेलजवळील डी.पी.शेजारी सागर निंबा शेटे (वय २६, रा.शिरुड नाका, दत्त मंदिराजवळ, अमळनेर) हा गैरकायदा विनाशस्त्र परवाना शिवाय बाळगताना आढळला. सिल्व्हर व काळ्या रंगाच्या या पिस्तूलची किंमत २५ हजार रुपये आहे. मुठेवर लाल रंगाचा स्टार असलेला गावठा कट्टा व एक जिवंत पितळी राऊंडसह आढळला. त्याच्याविरुध्द अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, पिंपळकोठा गोळीबारातील व धुळे रोडवरील दरोड्यातील आरोपीदेखील त्यांच्या संवादावर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी नजर ठेवून त्यांचे स्थलांतर, मित्रांशी संवाद, त्यांच्याजवळील पैसे संपल्यानंतर त्यांनी मित्रांकडे पैशांची केलेली मागणी यावरून चार आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. सोशल मीडिया गुन्हेगारांना जसा उपयोगी ठरते आहे. तसा आता पोलिसांच्या सतर्कतेने सोशल मीडियाचा वापर गुन्हेगारांसाठी घातक ठरत आहेअमळनेर शहरात काही तरुण व्हॉटसपवर अवैध शस्त्रांची विक्री-खरेदी करीत असल्याची गोपनिय माहिती पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी मिळाली. त्याअनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी सदर अवैध शस्त्राचे रॅकेट शोधकामी डीवाय.एस.पी. राजेद्र ससाणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम, अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांना सूचना व मार्गदर्शन केले होते. पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडून सहायक फौजदार अशोक महाजन, विजय पाटील, नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, नरेंद्र वारुळे, मनोज दुसाने, दीपक शिंदे, प्रवीण हिवराळे, किरण धनगर, महेश पाटील, दीपक छबू पाटील तसेच अमळनेर पोलीस स्टेशनचे शरद तुकाराम पाटील, रवींद्र्र अभिमन पाटील व मारवड पोलीस स्टेशनचे पोहेकॉ.विजय साळुखे, सुनील आगोण या पथकाने दोघांना पकडले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmalnerअमळनेर