शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी हितासाठी अभ्यासक्रमाचे धोरण शासनाने ठरवू नये - चेतन एरंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 13:12 IST

शासनाकडून शिक्षणाचा वापर समाजाचे मत तयार करण्यासाठी होतो

ठळक मुद्देशाळांमध्ये गरजा ओळखून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावेडोनेशनच्या खर्चातून मुलांना अनुभव मिळवून द्यावा

जळगाव : शासनाकडून शिक्षणाचा वापर केवळ समाजाचे मत तयार करण्यासाठी केला जात आहे. विद्यार्थी भविष्यात समाधानी राहील असे शिक्षण सध्या दिले जात नाही. त्यामुळे अभ्यासक्रम ठरविण्याचे धोरण हे शासनाने ठरवूच नये असे मत पुणे येथील ‘होमस्कुलींग’ची संकल्पना राबविणारे चेतन एरंडे यांनी व्यक्त केले.एका कार्यक्रमासाठी चेतन एरंडे हे नुकतेच शहरात आले होते. यावेळी ‘लोकमत’ ने त्यांच्याशी संवाध साधला असता, त्यांनी ते राबवत असलेल्या ‘होमस्कुलींग’मुळे मुलांची थांबणारी घुसमट व आजच्या शिक्षण व्यवस्थेसमोर असलेल्या अडचणी बाबत एरंडे यांनी माहिती दिली. एरंडे म्हणाले की, शासनाने शिक्षणव्यवस्थेत बदल न करता, केवळ शिक्षण चळवळीतील तज्ज्ञांना सोबत घेवून त्यांना निधी देण्याचे काम केले पाहिजे. शासनाने शिक्षण व्यवस्थेत ढवळाढवळ करु नये असेही एरंडे म्हणाले.कोण आहेत चेतन एरंडेचेतन एरंडे हे गेल्या चार वर्षांपासून पुणे येथे ‘होमस्कुलींग’ ची संकल्पना राबवत आहेत. मुलांना शाळेत न पाठवता त्यांचा अभ्यास घरातच करून घेवून, मुलाची प्रचलित शिक्षणव्यवस्थेत होणारी घुसमट दुर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी या उपक्रमाची सुरुवात स्वत:च्या मुलापासून केली आहे. त्यांच्या मते मुलाला हव्या त्या गतीने, कलाने व मर्जीने शिक्षण घेण्याची व माणूस म्हणून त्याला मिळालेल्या क्षमता ओळखण्याची व त्या क्षमता पूर्ण ताकदीने वापरण्याची संधी उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. त्या उपक्रमात पुण्यातील २५० विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचेही एरंडे यांनी सांगितले.शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा गरजा ओळखून शिक्षण दिले जात नाही. ठराविक वेळेत निश्चित केलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना देखील ठराविक वेळेतच शाळेत जाणे, अभ्यासक्रम पूर्ण करणे व परीक्षा देणे हे निश्चित होत जाते. त्यामुळे विद्यार्थी तणावात येतो. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या गजरा ओळखून शिक्षण देण्याची गरज असल्याचे मत एरंडे यांनी व्यक्त केले.डोनेशनच्या खर्चातून मुलांना अनुभव मिळवून द्यावासध्याचे शिक्षण हे सर्वसामान्यांना न पेलण्यासारखेच आहे. लाखो रुपयांचे डोनेशन देत खासगी शाळांमध्ये विद्यार्थी घातले जात आहेत व त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे लाखो रुपयांचे डोनेशनवर खर्च न करता त्यातून मुलांना नवीन अनुभव मिळावा यावर हा खर्च करावा. विद्यार्थ्यांना आवडणारे साहित्य, खेळावर हा खर्च करावा. तसेच ‘होमस्कुलींग’साठी पालकांनी देखील वेळ काढला पाहिंजे. घरीच अभ्यासक्रम पूर्ण करून ‘एन.आय.ओ.एस.’ या भारत सरकारच्या मुक्त शिक्षण विषयी सर्वाधिकार असलेल्या संस्थेच्या माध्यमातून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे असेही एरंडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव