शहरं
Join us  
Trending Stories
1
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
4
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
5
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
6
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
7
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
8
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
9
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
10
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
11
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
12
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
13
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
14
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
15
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
16
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
17
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
18
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
19
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
20
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सोने पुन्हा पन्नास हजारांच्या पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या आठवड्यापासून घसरण होत असलेल्या सोने-चांदीच्या दरामध्ये पुन्हा वाढ सुरू झाली आहे. ५० हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या आठवड्यापासून घसरण होत असलेल्या सोने-चांदीच्या दरामध्ये पुन्हा वाढ सुरू झाली आहे. ५० हजार रुपयांच्या खाली गेलेले सोने शुक्रवारी पुन्हा ५० हजार २०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. चार दिवसांत सोन्यात एक हजार ५०० रुपयांनी वाढ झाली. चांदीच्या दरामध्ये पाच दिवसांत पाच हजार रुपयांनी वाढ होऊन ती ६० हजार रुपयांवरून थेट ६५ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढत असल्याने भाव वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पन्नास हजार रुपयांच्या पुढे असलेल्या सोन्याच्या भावात २७ नोव्हेंबरपासून घसरण सुरू झाली. हे भाव कमी कमी होत जाऊन ३० नोव्हेंबर रोजी ४८ हजार ७०० रुपयांपर्यंत आले होते. त्यानंतर मात्र १ डिसेंबर रोजी हेच भाव कायम राहून २ रोजी ९०० रुपयांनी वाढ होऊन सोने ४९ हजार ६०० रुपयांवर पोहोचले. त्यानंतर ३ डिसेंबर रोजी सोने ५० हजार रुपयांवर पोहोचले. ४ रोजी पुन्हा त्यात २०० रुपयांनी वाढ होऊन सोने ५० हजार २०० रुपये प्रतितोळा झाले. अशाच प्रकारे चांदीचे भाव कमी कमी होत जाऊन ३० नोव्हेंबर रोजी ६० हजार रुपयांवर आले होते. मात्र, १ डिसेंबर रोजी चांदी ६१ हजार, २ रोजी ६३ हजार, ३ रोजी ६४ हजार व आता ४ डिसेंबर रोजी ६५ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली.

लग्नसराई सुरू झाल्याने सोने-चांदीला मागणी वाढू लागल्याने ही भाववाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे.