शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

कारची काच फोडून साडेतीन लाख लांबविले

By admin | Updated: March 11, 2017 00:57 IST

गोलाणी मार्केटनजीकची घटना : भुसावळ येथील नगरसेवकाला धक्का; 3 दिवसातील दुसरी घटना

जळगाव :  गोलाणी मार्केटमध्ये मोबाईलचे स्क्रीन कव्हर तसेच टफन ग्लास बसविण्यासाठी गेलेल्या भुसावळातील नगरसेवक अमोल इंगळे यांच्या कारची काच फोडून कारमधील साडेतीन लाख रूपये लांबविल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाच्या कार्यालयाच्या गल्लीत घडली़ अर्धा तासाच्या अंतरात चोरटय़ांनी काच फोडून पैशांची कापडी पिशवी लांबविली़भुसावळ येथील नगरसेवक अमोल मनोहर इंगळे रा़ शांतीनगर हे सायंकाळी 5़ 45 वाजता त्याच्या कारने (एम एच 19 बी़डी़ 4141) जळगावात आल़े   खाजगी कामासाठीचे अडीच लाख रूपये त्यांनी कापडी पिशवी सोबत आणले. जळगावात आल्यानंतर त्यांना आणखी पैशांची आवश्यकता असल्याने त्यांनी बालाजी बिल्डींग, जुने जळगाव येथील त्यांच्या गोविंदभाई नामक मित्राकडून एक लाख रूपये घेतल़े घरून आणलेले अडीच लाख व एक लाख असे एकूण शंभर, पाचशे व दोन हजाराच्या नोटा असलेले साडेतीन लाख रूपये कापडी पिशवीत ठेवल़े तीन दिवसात दुसरी घटनामनोज पंढरीनाथ मराठे (रा़खोटेनगर, मूऴभडगाव) हे जळगावात औषध तयार करणा:या एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. मंगळवारी ते भडगाव येथून त्यांची आई प्रमिला मराठे यांना जळगावात घेऊन आले होते. दुपारी 12 वाजता दवाखान्यात जाण्यासाठी त्यांनी शिवतीर्थ मैदानाच्या कंपाउंड बाहेर कार (क्ऱएम़एच- 19 ए़वाय 8891) लावली. डॉक्टरांकडे जाऊन दोघे मायलेक 15 मिनिटांत पुन्हा कारजवळ आले. त्यांच्या उभ्या असलेल्या कारच्या खिडकीची काच फोडून चोरटय़ांनी गाडीतील 35 हजार रुपये रोख, ग्रॅम सोन्याचे दागिने, लॅपटॉप असा 87 हजारांचा ऐवज असलेली बॅग लांबविली होती़ घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच शुक्रवारी पुन्हा साडेतीन लाख रूपये लांबविल्याने पोलिसांचा धाक नसल्याचे समोर आले आहे. अध्र्या तासात चोरटय़ांची हातसफाईमोबाईलला स्क्रीन कव्हर तसेच टफन ग्लास लावायचा असल्याने इंगळे कारने सायंकाळी 6़15 वाजता गोलाणी मार्केटजवळ पोहचल़े यादरम्यान त्यांनी अग्निशमन  कार्यालयाच्या गल्लीत कार्यालयासमोर रस्त्याच्या एका बाजूला कार लावली़ यानंतर ते गोलाणी मार्केटमध्ये मोबाईल दुकानावर केल़े स्क्रीन कव्हर तसेच टफन लावत असताना त्यांना कारमध्ये पैसे असल्याचे लक्षात आल़े त्यांनी तत्काळ कारकडे धाव घेतली़ गाडीजवळ पोहचले असता दगडाच्या सहाय्याने कारच्या डाव्या बाजूची काच फोडलेली होती व मागील सिटवर ठेवलेली साडेतीन लाख रूपये असलेली कापडी पिशवी नसल्याचे समजल़े चोरी झाल्याची खात्री झाल्यावर त्यांनी शहर पोलिसांना घटना कळविली़