चिमुकलीचा दुर्दैवी अंत! गोबर गॅसच्या टाकीत पडून ६ वर्षीय बालिकेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 20:09 IST2021-10-21T20:08:21+5:302021-10-21T20:09:05+5:30

Death of Kid : गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास ती गोबर गॅस टाकीजवळ खेळत होती.

Girl's unfortunate end! 6-year-old girl dies after falling into dung gas tank | चिमुकलीचा दुर्दैवी अंत! गोबर गॅसच्या टाकीत पडून ६ वर्षीय बालिकेचा मृत्यू

चिमुकलीचा दुर्दैवी अंत! गोबर गॅसच्या टाकीत पडून ६ वर्षीय बालिकेचा मृत्यू

ठळक मुद्देपरी ही जे. टी. महाजन शाळेत इयत्ता दुसरीत शिकत होती. परीचा मृतदेह पाहताच आई, वडील, भाऊ, आजी- आजोबा यांनी एक हंबरडा फोडला.

रावेर जि. जळगाव  : खेळता - खेळता गोबर गॅसच्या टाकीत पडल्याने सहा वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही गुरुवारी सायंकाळी रोझोदा ता. रावेर येथे उघडकीस आली. परी पुष्कर फेगडे असे या बालिकेचे नाव आहे. गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास ती गोबर गॅस टाकीजवळ खेळत होती.

खेळता - खेळता ती टाकीत पडली. त्यावेळी गल्लीत कुणीच नव्हते. सायंकाळी ती दिसत नसल्याने तिचा शोध घेतला असता ती टाकीत पडलेली आढळली. पण तोपर्यंतउशीर झाला होता. परी ही जे. टी. महाजन शाळेत इयत्ता दुसरीत शिकत होती. परीचा मृतदेह पाहताच आई, वडील, भाऊ, आजी- आजोबा यांनी एक हंबरडा फोडला.

Web Title: Girl's unfortunate end! 6-year-old girl dies after falling into dung gas tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.