सीमेवरील जवानांना विद्यार्थिनींनी बांधल्या राख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 05:34 PM2018-08-26T17:34:25+5:302018-08-26T17:34:46+5:30

पारोळा येथे बोहरा सेंट्रल स्कूलमध्ये आगळा उपक्रम

The girls from the border were built by the girls | सीमेवरील जवानांना विद्यार्थिनींनी बांधल्या राख्या

सीमेवरील जवानांना विद्यार्थिनींनी बांधल्या राख्या

Next

पारोळा, जि.जळगाव : घरोघरी विविध सण, उत्सव साजरे होत असताना देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना मात्र कुठलाही सण नाही की उत्सव नाही, देशाची सुरक्षा करणे हेच एकमेव ध्येय त्यांच्यासमोर असल्यामुळे रक्षाबंधन असो, भाऊबीज असो की अन्य उत्सव अशा उत्सवांची ते आतुरतेने वाट पाहात असतात. रक्षाबंधनानिमित्त देशभरातील विविध समाजिक आणि शैक्षणिक संस्था सीमेवरील सैनिकांना राखी बांधून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात. अशाच सामाजिक बांधिलकी असलेल्या पारोळा शहरातील बोहरा सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थिनींनी सैनिकांना राख्या बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा केला.
कार्यक्रमाची सुरुवात नृत्यगीताने झाली. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन सुरेद्र बोहरा, डॉ.गौरव बोहरा, प्रा.शैलेश पाटील, मधुकर देशमुख, रेवानंद चौधरी, प्राचार्या शोभा सोनी, व्यवस्थापक वीरेन संखा हे मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र बटालियन कमांडो कर्नल अनिल जॉन, सुभेदार विनोद कुमार वंदनसिंग, हवालदार जयसिंग, बोहरसिंग या अधिकाºयांना विद्यार्थिनींनी राखी बांधून देशरक्षणाचे वचन घेतले. तसेच उपस्थित कमांडो अधिकाºयांचे संस्थेचे चेअरमन सुरेद्र बोहरा व ज्येष्ठ शिक्षकांंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बटालियन कमांडो यांनी, इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना लष्करातील अनुशासन व इतर बाबींबाबत माहिती दिली. मुलांना यांच्या बोलण्यापासून प्रेरणा मिळाली. आपले अनुभव सांगून आपल्याजवळ जे सुप्त गुण आहेत ते विकसित करुन त्याआधारे सदैव तयार रहावे. तसेच उच्च पदावर गेल्यावर आपले आई-वडिल व गुरुजनांना जीवनात कधीही विसरू नये, असे सांगितले आणि विद्यार्थ्यांमधील अथर्व कुलकर्णी या विद्यार्थ्याची बाजीराव म्हणून निवड केली. त्यास बटालियनची खास टोपी परीधान केली. विद्यार्थिनींनी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना राखी बांधली.
कार्यक्रमाचे मनोरंजन म्हणून इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्यगीते सादर केली. शाळेत राखी बनवणे, थाली सजावट व भेटकार्ड बनविणे या स्पर्धा घेण्यात आल्या.
इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी पारोळा पोलीस ठाण्यात जावून पोलीस बांधवांना राखी बांधून अनोख्या पध्दतीने रक्षाबंधन सोहळा साजरा केला.
कार्यक्रम यशस्वितेसाठी नयना कुळकर्णी, स्वाती बालखंडे, जयेश सोनार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Web Title: The girls from the border were built by the girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.