गिरीशभाऊ....पिस्तूल घेऊन फिरल्याने जनतेचे प्रश्न सुटत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 21:13 IST2018-11-18T21:10:05+5:302018-11-18T21:13:08+5:30
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना जलसंपदा खाते कळालेले नाही. हातात पिस्तूल घेऊन अन् इन करून फिरल्याने जनतेचे प्रश्न सुटत नसल्याची टीका पारोळ्याचे आमदार डॉ.सतीश पाटील यांनी केली.

गिरीशभाऊ....पिस्तूल घेऊन फिरल्याने जनतेचे प्रश्न सुटत नाही
पारोळा : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना जलसंपदा खाते कळालेले नाही. हातात पिस्तूल घेऊन अन् इन करून फिरल्याने जनतेचे प्रश्न सुटत नसल्याची टीका पारोळ्याचे आमदार डॉ.सतीश पाटील यांनी केली.
तामसवाडी येथील बोरी नदीवर नाथ बाबा मंदिरा जवळ ८१ लाख ४३ हजार किंमतीचा कोल्हापूर बंधाºयाचे भूमिपुजन आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी खासदार वसंतराव मोरे तर व्यासपीठावर माजी सरपंच हिरामण पाटील, शिक्षक नेते हनुमंतराव पवार, जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील, हिम्मत पाटील, उपसभापती ज्ञानेश्वर पाटील, सदस्य अशोक पाटील, कार्यकारी अभियंता नंदनवन उपस्थित होते
आमदार डॉ.सतीश पाटील म्हणाले की, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना जलसंपदा खातेच कळाले नाही. त्या खात्याचा उपयोग त्यांनी जिल्ह्यासाठी काही केला नाही. फक्त हातात पिस्तुल घेऊन आणि इन करून फिरणे म्हणजे लोकांचे प्रश्न सुटत नसल्याची टीका त्यांनी केली. गिरणा धरणावर असलेले चनकापूर व हरणबारी या दोन धरणातून १५ टक्के पाणी सोडले तर जळगाव जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सुटेल असे त्यांनी सांगितले. नेतृत्वाअभावी जिल्हा दिशाहीन झाल्याचे त्यांनी सांगितले.