शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

गेटमनच्या प्रसंगावधानामुळे मालगाडीचा अपघात टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:12 IST

जळगाव : जळगावहून पाचोऱ्याकडे जाणाऱ्या मालगाडीच्या चाकातून ‘धूर’ निघत असल्याचे दिसताच, म्हसावद स्टेशनजवळील गेटमनने तात्काळ म्हसावद स्टेशन मास्तरांना ...

जळगाव : जळगावहून पाचोऱ्याकडे जाणाऱ्या मालगाडीच्या चाकातून ‘धूर’ निघत असल्याचे दिसताच, म्हसावद स्टेशनजवळील गेटमनने तात्काळ म्हसावद स्टेशन मास्तरांना घटनेची माहिती दिली. तर म्हसावदच्या स्टेशन मास्तरांनी ही मालगाडी थांबविण्यासाठी माहेजीला कळविले. माहेजीच्या स्टेशन मास्तरांनी तात्काळ या प्रकाराची माहिती भुसावळ नियंत्रण कक्षाला कळवून, नियंत्रण कक्षातर्फे या गाडीला परधाडे स्टेशनला थांबविण्यात आले. गेटमनच्या प्रसंगावधानामुळे या मालगाडीचा अपघात टळला आहे. या घटनेमुळे मुंबईकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेस व गीतांजली एक्सप्रेस गाड्या उशिराने धावल्या.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जळगावहून पाचोऱ्याकडे जाणाऱ्या मालगाडीच्या चाकातून मोठ्या प्रमाणावर ‘धूर’ निघत असल्याचे म्हसावद स्टेशनवरील गेटमन गोविंदा पाटील यांच्या लक्षात आले. रेल्वेच्या भाषेत याला (हार्ट ॲक्सेल) असे म्हटले जाते. धावत्या गाडीचे ‘चाक’ गरम होऊन, त्यातून धूर निघतो व चाक बाहेर येऊन अपघात घडण्याची शक्यता असते. हा प्रकार गोविंदा पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर, त्यांनी क्षणाचाही विलंब न करता म्हसावदच्या स्टेशन मास्तरांना घटनेची माहिती दिली. या मालगाडीने म्हसावद स्टेशन पार केल्यामुळे, म्हसावदच्या स्टेशन मास्तरांनी ही मालगाडी थांबविण्यासाठी माहेजीच्या स्टेशन मास्तरांना कळविले. त्यानंतर माहेजीच्या स्टेशन मास्तरांनी तात्काळ भुसावळ नियंत्रण कक्षाला कळविले. त्यानंतर नियंत्रण कक्षातर्फे वेगाने धावणारी ही गाडी परधाडे स्टेशनला थांबविली.

इन्फो :

पाचोऱ्याला ‘चाक’ निखळणारा डबा केला वेगळा

परधाडे स्टेशनवर ही मालगाडी थांबल्यानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ‘धूर’ निघत असल्यामु‌ळे जे ‘चाक’ निखळणार होते. त्या चाकावरील मालगाडीचा एक डबा बाजूला काढण्यासाठी सर्व यंत्रणा तयार ठेवली होती. मात्र, हा डबा बाजूला करण्यासाठी परधाडे स्टेशनला पर्यायी रेल्वे लाइन नसल्यामुळे, ही मालगाडी संथगतीने पाचोरा स्टेशनवर आणण्यात आली. या ठिकाणी पर्यायी लाइनवर ही मालगाडी उभी करून, ‘चाक’ निखळणारा हा डबा वेगळा करण्यात आला व त्यानंतर पाऊण तासाने ही गाडी चाळीसगावकडे रवाना करण्यात आली.

इन्फो :

म्हसावद स्टेशनवरील गेटमन गोविंदा पाटील यांंना मालगाडीत ‘हार्ट ॲक्सेल’चा तांत्रिक प्रकार घडला असल्याचे निदर्शनास आल्यामुळे, त्यांनी तात्काळ संबंधितांना माहिती देऊन, होणारी दुर्घटना यामुळे टाळता आली. पाचोरा स्टेशनवर या मालवाडीचे ‘हार्ट ॲक्सेल’मुळे जे ‘चाक’ निखळणार होते, ते बदलण्यात आले. त्यानंतर ही मालगाडी पुढे रवाना करण्यात आली.

-सुधाकर जाधव, स्टेशन प्रबंधक, पाचोरा रेल्वे स्टेशन

इन्फो :

गाड्यांच्या खोळंब्यामुळे प्रवाशांचा गोंध‌ळ

या घटनेमुळे जळगावहून मुंबईकडे जाणारी कर्नाटक एक्स्प्रेस ही जळगाव रेल्वेस्टेशनवर, तर गीतांजली एक्स्प्रेस भुसावळ रेल्वेस्टेशनवरच थांबविण्यात आली. मात्र, कर्नाटक एक्स्प्रेस जळगावला थांबली असताना, गाडीतील बहुतांश प्रवासी खाली उतरून एकमेकांशी मजाक-मस्तरी व गोंधळ घालताना दिसून आले. यावेळी काही प्रवासी विरुद्ध दिशेने रेल्वे लाइन ओलांडून पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या भरताना दिसून आले. विशेष म्हणजे विरुद्ध दिशेने गाडी येत असतानाही काही प्रवासी जीव धोक्यात, रेल्वे ओलांडत होते. या प्रवाशांना रेल्वे सुरक्षा बलाचे जवान दिलीप बारी यांनी कारवाई करण्याचा इशारा देऊन चांगलेच खडसावले.