सोलर प्रकल्पप्रकरणी न्याय मिळावा, अन्यथा सामूहिक आत्मदहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 06:58 PM2020-10-01T18:58:26+5:302020-10-01T19:00:37+5:30

न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेले सोलर पीडित शेतकरी निसर्गाच्या रोषालाही बळी पडले आहेत.

Get justice in solar project case, otherwise mass self-immolation | सोलर प्रकल्पप्रकरणी न्याय मिळावा, अन्यथा सामूहिक आत्मदहन

सोलर प्रकल्पप्रकरणी न्याय मिळावा, अन्यथा सामूहिक आत्मदहन

Next
ठळक मुद्देचाळीसगाव : प्रकल्पग्रस्त संतप्त शेतकऱ्यांनी दिले तहसीलदारांना निवेदनकाहींनी जमिन विकण्यास विरोध दर्शविला असता धमकवण्यात आले

चाळीसगाव : तालुक्यातील मोजे बोढरे, शिवापूर, पिंपरखेड, रांजणगाव शिवारातील सोलर प्रकल्प पीडित शेतकऱ्यांना शासनाने न्याय न दिल्यास सर्व पीडित शेतकरी सामुदायिक आत्मदहन करतील, असा इशारा शेकडो संतप्त शेतकºयांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन गुरुवारी दुपारी तहसीलदारांना देण्यात आले. बेकायदा सोलर प्रकल्पावर कारवाई होण्यास विलंब होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, गत सरकारच्या काळात आमच्यावर अन्याय झाला. शासनाने कसून खाण्यासाठी दिलेल्या नवीन अविभाज्य शर्तीच्या सुमारे १२०० एकर शेत जमिनी आमची दिशाभूल करून उद्योगपतींनी कवडीमोल भावात हडप केलेल्या आहेत. या शेतजमिनींची खरेदी होत असताना जमीन महसूल संहिता, १९६६ तसेच मुंबई कुळ-कायदा १९४८ च्या कलम ६३-१अ च्या तरतुदींचा भंग झाला आहे. आमच्यापैकी काहींनी जमिन विकण्यास विरोध दर्शविला असता धमकवण्यात आले.
न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेले सोलर पीडित शेतकरी निसर्गाच्या रोषालाही बळी पडले आहेत. त्यामुळे मायबाप सरकारने वेळीच याकडे गांभिर्याने लक्ष घालून कारवाई सुरू करावी अन्यथा आम्हा पीडित शेतकºयांना न्याय मिळवण्यासाठी संघटितपणे आत्मदहन करू, असा इशाराही देण्यात आला आहे.

Web Title: Get justice in solar project case, otherwise mass self-immolation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.