शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंरोजगारातून प्राप्त करा प्रगतीची सुवर्णसंधी

By admin | Updated: March 27, 2017 15:59 IST

प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विविध योजना अंमलात आल्या आहेत. मुद्रा बँक योजनेच्याद्वारे लहान मोठय़ा व्यावसायिकांना अर्थसहाय्य करण्याची योजना आहे.

 गिरीष महाजन : मुद्रा मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

      जळगाव,दि.27- सर्व सामान्य माणसाचं जीवनमान उंचवावे यासाठी प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विविध योजना अंमलात आल्या आहेत. मुद्रा बँक योजनेच्याद्वारे लहान मोठय़ा व्यावसायिकांना अर्थसहाय्य करण्याची योजना आहे. या योजनेची माहिती जाणून स्वयंरोजगाराची सुरुवात करुन आपल्या प्रगतीची सुवर्णसंधी साध्य करा, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन यांनी सोमवारी येथे केले.
जिल्हास्तरीय मुद्रा बँक समन्वय समितीतर्फे जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मुद्रा लोन मेळावा झाला. उद्घाटन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन  यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उज्‍जवला पाटील, जळगावचे आमदार सुरेश भोळे, विधानपरिषद आमदार चंदूभाई पटेल,महापौर नितीन लढ्ढा, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय,  उपविभागीय अधिकारी जलज शर्मा,  जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश वाघ  उपस्थित होते.
महाजन म्हणाले की, मुद्रा बँक योजना ही व्यवसाय  उद्योगासाठी विनातारण कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना आहे.  आपल्या देशातील बेरोजगारीची समस्या समूळ नष्ट करण्यासाठी स्वयंरोजगाराला चालना देणारी ही योजना आहे. आपल्या व्यवसायासाठी बँकांमध्ये जाऊन या योजनेची माहिती घ्या आणि आपल्या प्रगतीची सुवर्णसंधी साधा, असे आवाहन त्यांनी केले.
सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी केले तर तहसिलदार अमोल निकम यांनी आभार मानले.