खाजगी डॉक्टरांची शासकीय कोविड सेंटरला मोफत सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 11:57 PM2021-04-07T23:57:50+5:302021-04-07T23:58:22+5:30

प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्या आवाहनानुसार किमान ३५ खाजगी डॉक्टरांनी शासकीय कोविड सेंटरला मोफत सेवा देत आहेत. 

Free service of private doctors to Government Kovid Center | खाजगी डॉक्टरांची शासकीय कोविड सेंटरला मोफत सेवा

खाजगी डॉक्टरांची शासकीय कोविड सेंटरला मोफत सेवा

Next
ठळक मुद्दे प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद.

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : तालुक्यात  कोरोनाने थैमान माजवले असून शासकीय वैद्यकीय सेवा तोकडी पडू लागल्याने अखेर प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्या आवाहनानुसार किमान ३५ खाजगी डॉक्टरांनी शासकीय कोविड सेंटरला मोफत सेवा देत आहेत. 

तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आणि अत्यवस्थ होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असल्याने दोन शासकीय कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले. डॉक्टरांची संख्याही अपूर्ण पडू लागल्याने रुग्णाकडे लक्ष दिले जात नाही, अशी ओरड होत होती. अखेर प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांना मोफत कोविड सेंटरला सेवा देण्याचे आवाहन केले.

आपला व्यवसाय आणि उत्पन्न बुडवून डॉ. दीपाली महाजन, डॉ. चेतन पाटील, डॉ. रूपाली पाटील, डॉ. उमेश सोनवणे, डॉ. जितेंद्र पाटील, डॉ. इम्रान कुरेशी, डॉ. तुषार परदेशी, डॉ. महेंद्र चव्हाण, डॉ. लीना चौधरी, डॉ. रईस बागवान, डॉ. रोहिदास महाजन, डॉ. दीपक चव्हाण, डॉ. मनीषा चव्हाण, डॉ. पुरुषोत्तम सूर्यवंशी, डॉ. चंद्रशेखर पाटील, डॉ. सचिन पाटील, डॉ. चंद्रकांत पाटील,  डॉ. एजाज रंगरेज, डॉ. गौरव मुठे, डॉ. डी.एम. पाटील, डॉ. योगेश नेतकर, डॉ. निलेश जैन, डॉ. विशाल बडगुजर, डॉ. निलेश पाटील, डॉ. सुशीलकुमार बडगुजर, डॉ. विजय बागुल, डॉ. घनश्याम पाटील, डॉ. प्रमोद कोळी, डॉ. अनुप महाजन,  डॉ. विजय ठाकरे, डॉ. मिलिंद पाटील, डॉ. कमलेश पाटील हे सेवा देत आहेत. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना चांगली सेवा मिळत आहे.

Web Title: Free service of private doctors to Government Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.