शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

चार मार्केटप्रश्नी शर्तभंग केल्याचा ठपका

By admin | Updated: March 10, 2017 00:27 IST

जागा सरकार जमा का करू नये : नोटीस देण्यासाठी जिल्हाधिकारी प्राधिकृत

जळगाव : मनपाच्या फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केटसह चार मार्केटची जागा शासनाची असून तत्कालीन नपाने या जमिनीच्या वापराच्या प्रयोजनात बदल करण्यासाठी व गाळे हस्तांतरणासाठी जिल्हाधिकारी अथवा शासनाची पूर्वपरवानगी घेतलेली नसल्याने शर्तभंग झालेला दिसून येत आहे. ही जमीन शर्तभंगाच्या कारणास्तव सरकार जमा का करण्यात येऊ नये? याबाबत मनपाला कारणे दाखवा नोटीस देण्यासाठी जिल्हाधिकाºयांना प्राधिकृत करण्यात आले असल्याचे पत्र शासनाचे उपसचिव डॉ.संतोष भोगले यांनी जिल्हाधिकाºयांना पाठविले आहे. त्यामुळे मनपाच्या मार्केट गाळे कराराच्या विषयात आणखी एक अडसर निर्माण झाला         आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकाºयांनी या विषयात शर्तभंग झालेला नसल्याचा अहवाल गतवर्षी १५ फेब्रुवारी रोजीच पाठविला आहे. मनपाने गाळे कराराच्या केलेल्या ठरावाविरोधात गाळेधारकांनी  ही जागा शासनाची असल्याने त्याबाबत शासनानेच निर्णय घ्यावा, अशी मागणी केली होती. त्यावर शासनाने मनपा व महसूल विभागाकडून जागेच्या मालकी हक्काबाबत पुरावे मागितले होते. महसूल विभागाच्या प्रधान सचिवांकडे याबाबत सुनावणी  होत असून पहिल्या सुनावणीत मनपाने ही जागा मनपाला कायमस्वरूपी वापरासाठी दिली होती. तसेच जागेची सनदही मनपाच्या नावे असल्याचा पुरावा सादर केला होता. प्रधान सचिवांनी जागेच्या मालकीबाबत मनपा व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आखणी पुरावे मागितले होते. जिल्हाधिकाºयांना यासंदर्भात कक्ष अधिकाºयांनी २०१६ मध्ये पत्र पाठवून जागेच्या मालकीबाबतच्या पुराव्यांसह अहवाल ५ फेब्रुवारीपर्यंत मागविला होता. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाºयांनी १५ फेब्रुवारी रोजी शासनाला पाठविला होता. त्यात शर्तभंग झालेला नसल्याचे नमूद केले होते. मात्र तरीही शासनाकडून मात्र शर्तभंग झाल्याचा ठपका मनपावर ठेवण्यात आला आहे. काय आहे पत्रशासनाचे महसूल विभागाचे उपसचिव डॉ.संतोष भोगले यांनी २२ फेब्रुवारी २०१७ रोजीच जिल्हाधिकाºयांना हे पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, जळगाव शहर सिसनं. १९३८/३७/ब-१ ही व्यापारी संकुले असलेली मुळची शासकीय जागा मालकी हक्काने मिळण्याबाबत महात्मा फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केटमधील गाळेधारकांच्या सहकारी फेडरेशनच्या निवेदनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांचे अहवाल शासनास प्राप्त झाले. त्या अनुषंगाने या व्यापारी संकुलाची जमीन ही ‘ब’ सत्ता प्रकाराची असून दैनिक बाजार व आठवडे बाजार या प्रयोजनार्थ निरंतर वापरासाठी शासनाने प्रदान केलेली आहे. मात्र याप्रकरणी तत्कालीन नगरपालिकेने या जमिनीच्या वापराच्या प्रयोजनात बदल करण्यासाठी व गाळे हस्तांतरण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची अथवा शासनाची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य असताना अशी कुठलीही पूर्वपरवानगी घेतलेली नसल्याने याप्रकरणी शर्तभंग झालेला दिसून येत आहे. ही जमीन शर्तभंगाच्या कारणास्तव सरकारजमाका करण्यात येऊ नये? याबाबत मनपास कारणे दाखवा नोटीस देण्यासाठी जिल्हाधिकाºयांना प्राधिकृत करण्यात येत असल्याचे व त्यानुसार पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्याचे या पत्रात सूचित करण्यात आले आहे. जमीन मनपाच्याच मालकीचीमहापौर नितीन लढ्ढा यांनी सांगितले की, मुळात ही जमीन शासकीय नाही. ज्या सनदीच्या आधारे ३० वर्षांच्या कराराने वापरासाठी दिली त्यातील डेलीबाजारासाठीचा वापर बदलल्याचा तसेच गाळे हस्तांतरीत केल्याने विनापरवानगी हस्तांतरण केल्याचा असे दोन्ही आक्षेप गैरलागू आहेत. बॉम्बे लॅण्ड रेव्हीन्यू कोड च्या कलम ४८ च्या अनुषंगाने सनद दिली. त्यात बांधकाम परवाना देण्यात आला आहे. १९३१ला ही बांधकाम परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे याविषयी महसूलमंत्र्यांकडे बाजू मांडू. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडेही हा विषय मांडू. शासनाकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल.  महात्मा फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील गाळेधारकांनी गाळेधारक फेडरेशन स्थापन केली असून त्यांनी ही शासकीय जमीन मालकी हक्काने मागितली आहे. त्यासाठी मनपाला ही नोटीस दिली जात आहे. ज्या स्वायत्त संस्थेच्या ताब्यात १०० वर्षांपासून ही जमीन आहे. ती काढून खाजगी व्यक्तींना देण्याचा प्रयत्न होत आहे. ४ हजार व्यापाºयांसाठी ५ लाख जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न होत आहे. मनपाचे ४०० कोटी अडकणारमनपाला या चार मार्केटमधील गाळेधारकांकडून पाच पट दंडासह २०१२ पासूनच्या भाड्यापोटी सुमारे २०० कोटींच्या आसपास उत्पन्न मिळणे अपेक्षित असून या गाळ्यांच्या स्पर्धात्मक लिलावाद्वारे करारातून २०० कोटींचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. मात्र या चार मार्केटच्या जागेवरून वाद निर्माण केल्यानंतर आता शासनानेच याबाबत शर्तभंगाचा ठपका मनपावर ठेवल्याने आता याप्रकरणी मनपाला शासनाकडे व त्यानंतर उच्च न्यायालयात दाद मागावी लागणार आहे. त्यात साहजिकच वेळ लागणार असून त्यामुळे मनपाचे सुमारे ४०० कोटींचे उत्पन्न अडकणार आहे. आधीच   आर्थिक अडचणीत असलेल्या मनपाला निवडणूक जवळ येण्याची चिन्ह दिसताच आणखी अडचणीत आणण्याचे डावपेच सुरू झाल्याची प्रतिक्रिया मनपा वर्तुळातून उमटत आहेत.