मालवाहू वाहनाच्या धडकेने रिक्षातील 4 जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2017 17:38 IST2017-04-09T17:38:19+5:302017-04-09T17:38:19+5:30

मालवाहू वाहनाने समोरुन येणा:या रिक्षाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षा चालक अविनाश विठ्ठल भोसले (वय 42 रा.चिंचोली, ता.जळगाव) यांच्यासह रिक्षातील चार प्रवाशी जखमी झाले.

Four injured in auto rickshaw vehicle rickshaw | मालवाहू वाहनाच्या धडकेने रिक्षातील 4 जखमी

मालवाहू वाहनाच्या धडकेने रिक्षातील 4 जखमी

 जळगाव,दि.9- कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रवेश करताना मालवाहू वाहनाने समोरुन येणा:या रिक्षाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षा चालक अविनाश विठ्ठल भोसले (वय 42 रा.चिंचोली, ता.जळगाव) यांच्यासह रिक्षातील चार प्रवाशी जखमी झाले. भोसले यांच्या हाताला व डोक्याला जबर मार बसल्याने रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रविवारी दुपारी साडे बारा वाजता हा अपघात झाला.

अविनाश भोसले हे चिंचोली येथून प्रवाशी घेऊन शहरात येत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांच्या रिक्षाला (एम.एच.19 वाय.7416) अजिंठा चौकाकडून येणा:या मालवाहू वाहनाने (एम.एच.19 एस.6249) वळण घेत असताना जोरदार धडक दिली. त्यात रिक्षाचा दर्शनी भाग अक्षरश: चक्काचूर झाला आहे. 

Web Title: Four injured in auto rickshaw vehicle rickshaw