वाघडू, ता. चाळीसगाव : रोकडे येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागात गोरगरीब जनतेचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. घर संसार भांडीकुंडी वाहून गेले आहेत. तसेच कच्चे घर पडून गेलेले आहेत. रोकडे तांडा येथील नदीकिनारी असलेल्या आदिवासी वस्तीमधील घरसंसार पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने संपूर्ण परिवार उघड्यावर पडलेले आहेत. त्यांची गरज लक्षात घेता सोमवारी वर्धमानभाऊ मित्र परिवाराच्या वतीने रोकडे तांडा येथील पूरग्रस्त नागरिकांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम यांच्या विनंतीवरून जावळे येथील ग्रामस्थांनादेखील जेवणाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले आहे. वर्धमान भाऊ धाडीवाल मित्र परिवारचे सदस्य मुराद पटेल, विजय गायकवाड, अजय घोरपडे, आकाश गवळी, किरण पवार यांनी रोकडे व जावळे येथे जाऊन जेवणाचे पाकीट वाटप केले.