कुलसचिवांपाठोपाठ वित्त लेखा अधिकाऱ्यांचाही 'प्रभारी' पदाचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:18 IST2021-07-29T04:18:20+5:302021-07-29T04:18:20+5:30

शिक्षण क्षेत्रात खळबळ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील दोन अधिकाऱ्यांनी 'प्रभारी' पदाचा राजीनामा ...

Following the registrar, the finance accounting officer also resigned from the post of 'in-charge' | कुलसचिवांपाठोपाठ वित्त लेखा अधिकाऱ्यांचाही 'प्रभारी' पदाचा राजीनामा

कुलसचिवांपाठोपाठ वित्त लेखा अधिकाऱ्यांचाही 'प्रभारी' पदाचा राजीनामा

शिक्षण क्षेत्रात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील दोन अधिकाऱ्यांनी 'प्रभारी' पदाचा राजीनामा दिल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या वृत्ताला प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी सुध्दा दुजोरा दिला आहे.

कर्मचाऱ्यांची पूर्वपरवागनी न घेता गोपनीय माहिती शिक्षण संचालक कार्यालयाला पाठविल्याचा आरोप करीत डॉ. श्यामकांत भादलीकर यांनी प्रभारी कुलसचिव पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सलग दोन दिवस विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. अखेर डॉ. भादलीकर यांनी मंगळवारी स्वत:हून राजीनामा दिला. नंतर बुधवारी सायंकाळी डॉ. सोमनाथ गोहील यांनी सुध्दा प्रभारी वित्त व लेखा अधिकारी पदाचा राजीनामा दिला. विद्यापीठातील प्रमुख पदांवर असलेल्या दोन अधिकाऱ्यांनी प्रभारी पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Web Title: Following the registrar, the finance accounting officer also resigned from the post of 'in-charge'